Home » Uncategorized » #IPL2022 | हार्दिक पंड्यासाठी धोनीची फिल्डिंग

#IPL2022 | हार्दिक पंड्यासाठी धोनीची फिल्डिंग

#ipl2022-|-हार्दिक-पंड्यासाठी-धोनीची-फिल्डिंग

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमात मुंबई इंडियन्स अष्टपैलू हार्दिक पंड्याला रिलीज करणार असे संकेत मिळत असतानाच चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्यासाठी फ्लिंडंग लावली आहे. धोनीच्या या हट्टामुळे पंड्यासाठी सीएसके लिलावात बोली लावणार आहे.

पुढील वर्षीच्या स्पर्धेच्या लिलावात सीएसके आणखी सरस खेळाडूंसाठी बोली लावणार आहे. त्यातच पंड्यासाठीही मोठी बोली लावली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

टी-20 विश्वकरंडक तसेच त्यापूर्वी झालेल्या यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरलेल्या पंड्यासाठी धोनीने संघ व्यवस्थापनाला विनंती करावी याचेच सध्या आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स पंड्याला वगळणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध ढझाले होते. सीएसके संघाचा स्टार अष्टपैलू ड्‌वेन ब्राव्होने निवृत्ती घेतल्यामुळे त्याच्या जागी पंड्याचा समावेश करण्याचा धोनीचा विचार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed