Home » Uncategorized » राशीभविष्य: मिथुनेला आज मिळणार परिश्रमांचं फळ; धनुने दगदग टाळावी

राशीभविष्य: मिथुनेला आज मिळणार परिश्रमांचं फळ; धनुने दगदग टाळावी

राशीभविष्य:-मिथुनेला-आज-मिळणार-परिश्रमांचं-फळ;-धनुने-दगदग-टाळावी

आज शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर 2021.तिथी कार्तिक कृष्ण सप्तमी. तुमच्या राशीत आजचा दिवस कसा असेल?

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

आज शुक्रवार दिनांक 26  नोव्हेंबर 2021.तिथी कार्तिक कृष्ण सप्तमी. चंद्र आज आश्लेषा नक्षत्रात भ्रमण करेल अणि शनीशी प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात  चंद्र घरांमधे काही  घटना घडतील. तुमचा आत्मविश्वास  वाढेल. कार्यक्षेत्रात सुसंधी मिळतील. मन स्थिर राहील. दिवस शुभ. वृषभ आज दुपारनंतर काही महत्त्वाचे फोन येतील. तुमच्यासाठी प्रवास योग घेऊन आलेला चंद्र दोन दिवस आनंद देणार आहे.  विशेष भेट मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील  दिवस शुभ . मिथुन आज राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण आर्थिक लाभ मिळवून देईल.  बुध भ्रमण सुखद अनुभव देणार आहे. परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. भाग्यशाली दिवस. कर्क आज मनावरचा ताण सैल होईल. प्रवास योग बनतील. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. दिवस चांगला  आहे. सिंह आज व्यय स्थानात  चंद्र मानसिक ताण निर्माण करेल. राशी स्वामी रवि वृश्चिक या  राशीत  एक प्रकारची  नकारात्मक ऊर्जा  निर्माण करीत आहेत. दिवस बरा जाईल. कन्या राशीच्या लाभ स्थानातील चंद्र भ्रमण अतिशय शुभ असुन वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करेल. संतती सुख मिळेल.मुलांना वेळ द्याल. दिवस शुभ. तुला दशमातील  चंद्र  अचानक कामाचा ताण निर्माण करेल. पण तुम्ही यशस्वी होणार  .येणारे दोन दिवस आनंदी व मौजमजेचे राहतील. खर्च वाढेल. वृश्चिक भाग्य स्थानात भ्रमण करणारा चंद्र  गेल्या काही दिवसापासुन वाटणारा ताण कमी करेल.  राशी च्या धन स्थानात शुक्र सुखद अनुभव देईल.  प्रकृती उत्तम ठेवा. म्हणजे दिवस आनंदात  जाईल. धनु आज अष्टमात असलेला चंद्र शारीरिक त्रास दर्शवतो. घरी आरामात रहा. दगदग टाळा. प्रवास नकोच. आर्थिक स्थिती बरी राहील. दिवस  मध्यम. मकर दिवस  आनंदाचा संदेश घेऊन येत आहे. पराक्रम, चिकाटी वाढेल. व्यवसायातून लाभ. प्रवासात सावध रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका.  जोडीदाराकडून लाभ. दिवस शुभ. कुंभ षष्ठ चंद्र  व्यय शनि आज  आर्थिक गैरसोय, अणि हेवेदावे याने  तुम्हाला त्रस्त करेल.  शांत रहा. मातृ पक्षातील व्यक्ती भेटतील. दिवस मध्यम जाईल. मीन संतती साठी काही महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी खर्च देखील होऊ शकतो. जोडीदाराची उत्तम साथ  लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश. दिवस शुभ. शुभम  भवतु !!

First published:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed