Home » Uncategorized » Indonesia Open | सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

Indonesia Open | सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

indonesia-open-|-सिंधू-उपांत्यपूर्व-फेरीत

latest-newsक्रीडामुख्य बातम्या

By प्रभात वृत्तसेवा

file pic

बाली – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने येथे सुरू झालेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला.

तिने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या व्होनी ली हिचा 21-12, 21-18 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातवी मानांकित असलेल्या सिंधूने 26 व्या मानांकित ली हिच्यावर अवघ्या 37 मिनिटांत मात केली.

या फेरीत आता तिचा सामना दक्षिण कोरियाच्या सीम युजीन व स्पेनच्या बेट्रीज कोराल्स यांच्यातील विजेतीशी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

#SemiFinalsIndonesia OpenPV Sindus

Prev Post

Pune Crime: भरदिवसा सराईतांकडून दुकानदारांना पिस्तूलाचा धाक, भेकराईनगरमधील घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed