Home » Uncategorized » अखेर किरण गोसावीला पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

अखेर किरण गोसावीला पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

अखेर-किरण-गोसावीला-पुणे-पोलिसांनी-घेतले-ताब्यात

ठळक बातमीपुणेमहाराष्ट्र

By प्रभात वृत्तसेवा

पुणे – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या व पुण्यासह अनेक शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावी हा अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले असून सध्या त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे.

किरण गोसावी याने आर्यन खानबरोबरचा फोटो व्हायरल केल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्यात तो फरार असल्याचे समोर आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Aryan Khan drugs casekiran gosaviNCBpune police

Prev Post

धावत्या “पीएमपी’ बसने घेतला पेट

1 thought on “अखेर किरण गोसावीला पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed