Home » Uncategorized » बंगालमधील “खेला होबे”च्या याच्यानंतर, उत्तरप्रदेशात “खदेडा होबे”

बंगालमधील “खेला होबे”च्या याच्यानंतर, उत्तरप्रदेशात “खदेडा होबे”

बंगालमधील-“खेला-होबे”च्या-याच्यानंतर,-उत्तरप्रदेशात-“खदेडा-होबे”

लखनौ -उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष (सप) आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने (सुभासप) बुधवारी आघाडी केली. त्या आघाडीने पश्‍चिम बंगालमधील खेला होबेच्या धर्तीवर खदेडा होबे हा नवा नारा दिला.

सपचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि सुभासपचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांच्या उपस्थितीत मऊमध्ये एक मेळावा झाला. त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या आघाडीबाबतची घोषणा करण्यात आली. मेळाव्यात बोलताना राजभर यांनी आघाडीचा नवा नारा जाहीर केला.

बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने खेला होबे (खेळ सुरू) ही घोषणा दिली. त्या पक्षाने निवडणुकीच्या खेळात भाजपचा पराभव केला. आता बंगालप्रमाणेच उत्तरप्रदेशात खदेडा होबे (हुसकावणे) होईल आणि राज्याची जनता भाजपला सत्तेवरून दूर करेल, असे त्यांनी म्हटले. राजभर यांनी दिलेल्या नाऱ्याला अखिलेश यांनी पसंती दर्शवली.

उत्तरप्रदेशात भाजपला सत्तेच्या मार्गावर नेणारा दरवाजा राजभर बंद करतील. सपचे कार्यकर्ते त्या दरवाजाला कुलूप लावतील, अशी शाब्दिक टोलेबाजी अखिलेश यांनी केली. उत्तरप्रदेशातील मागील निवडणुकीत सुभासपने भाजपशी आघाडी केली होती. आता त्या पक्षाने चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीतील आघाडीसाठी सपची निवड केली आहे.

1 thought on “बंगालमधील “खेला होबे”च्या याच्यानंतर, उत्तरप्रदेशात “खदेडा होबे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *