Home » Uncategorized » पुणे जिल्हा: आमदार अशोक पवार यांना संरक्षण द्या

पुणे जिल्हा: आमदार अशोक पवार यांना संरक्षण द्या

पुणे-जिल्हा:-आमदार-अशोक-पवार-यांना-संरक्षण-द्या

शिक्रापुरात निषेध ः धमकी देणाराचा तपास करण्याची मागणी
शिक्रापूर (वार्ताहर) –
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना निनावी पत्राद्वारे धमकी दिल्याचे पत्र आल्यानंतर त्याचे पडसाद तालुक्‍यात अनेक ठिकाणी उमटले आहेत. शिक्रापूर ग्रामस्थांनी देखील घटनेचा निषेध करत आमदार अशोक पवार यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समिती सदस्या जयमाला जकाते, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक अरुण करंजे, उपसरपंच रमेश थोरात, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, विशाल खरपुडे, मयूर करंजे, सुभाष खैरे, पूजा भुजबळ, मोहिनी मांढरे,

कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, तालुकाध्यक्ष नामदेव खेडकर, सोमनाथ भुजबळ, काका चव्हाण, बाबा चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य गौरव करंजे, निलेश थोरात, सागर सायकर, अमर करंजे, रमेश भुजबळ, बाळासाहेब वाबळे, अतुल ताजणे, विशाल गायकवाड यांसह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed