Home » Uncategorized » Dussehra : रावणदहन सोडा, इथे रावणाला मानतात देव; तर कोणी मानतं जावयाचं रूप

Dussehra : रावणदहन सोडा, इथे रावणाला मानतात देव; तर कोणी मानतं जावयाचं रूप

dussehra-:-रावणदहन-सोडा,-इथे-रावणाला-मानतात-देव;-तर-कोणी-मानतं-जावयाचं-रूप

दसरा म्हणजे रावणदहन असं चित्र अनेकांच्या मनात असतं. पण देशात (महाराष्ट्रातही) काही ठिकाणी दशाननाची पूजा केली जाते. एके ठिकाणी तर रावणाला जावई मानतात.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 14 ऑक्टोबर : महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी दसरा (dussehra 2021) साजरा केला जातो. या दिवसाला विजादशमी (Vijaya Dashmi 2021) सुद्धा म्हटले जाते, या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला होता. असं म्हणतात की विजयादशमीच्या दिवशी पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध केला. रावणाचं दहन याचंच स्मरण म्हणून केलं जातं. दुष्ट प्रवृत्ती जाळून टाकायच्या असा यामागचा उद्देश. शिवाय याच दिवशी नवरात्राची सांगता देखील केली जाते. माता सिंहावर आरूढ होऊन सीमोल्लंघनाला जाते असं म्हणतात. संपूर्ण देशभर दसरा हा मोठया जल्लोषात पार पडला जातो. आपल्याकडे विजया दशमीला शैक्षणिक महत्त्वही आहे. या दिवशी सरस्वती पूजन केलं जातं. विद्येच्या देवतेची आराधना करण्याचा, पूजा करण्याचा हा दिवस. उत्तर भारतात बहुतेक ठिकाणी दसरा म्हणजे रावणदहन हे समीकरण रूढ आहे. मात्र महाराष्ट्रात काही ठिकाणी मात्र याच्या बरोबर उलट श्रद्धा आहे. dussehra 2021: यंदाचा दसरा आहे विशेष; 3 शुभयोग एकाच मुहूर्तावर विदर्भात काही समाजांमध्ये रावणाला देवासमान मानलं जातं. त्याची पूजा केली जाते. या ठिकाणी होतं पूजन महाराजा रावण हे गौंड गणाचे अधिपती होते. त्याकाळचा गौंड गण म्हणजे दैत्य, दानव, राक्षस तर आजचा आदिवासी समाज. त्यामुळे महाराजा रावण हे आदिवासी समाजाचे आदिपुरूष ठरतात. ते आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहेत. भारताच्या बऱ्याच भागात महाराजा रावण यांची मनोभावे पुजा करण्यात येते. इतकेच नाही तर महाराजा रावण प्रकांड पंडीत होते. विविध शास्त्रांचे प्रचंड ज्ञान असुन धर्मशास्त्रात पारंगत होते. त्यामुळेच महाराजा रावण मृत्युशय्येवर असतांना श्रीरामांनी आपल्या धाकट्या भावाला लक्ष्मणाला राजशिष्टाचार, नीतीशास्त्राचे धडे घेण्यासाठी रावणाकडे पाठवल्यांचं कथा रूढ आहे. महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यातील रावणाची कथा ऐकलीय का? संपूर्ण देशभर रावणाच्या पुतळ्याला जाळले जाते. अकोला जिल्ह्यातल्या या गावात नाही. सांगोला तालुक्यात दशानन रावणाची अगदी यथासांग पूजा केली जाते. दोनशे वर्षापूर्वीपासून इथे रावणाला पुजले जाते, असे स्थानिक सांगतात.

  चंद्रपूर : रावण दहन प्रथा बंद करण्यासाठी नागरिकांनी काढली रॅली; पाहा VIDEO

  देशभर सर्वत्र रावणाला मारलं जातं हे खरय, पण अजून एका शहरात नाही पण शहरातील एका घरात रावणाची अगदी मनापासून पूजा केली जातो. देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणजे इंदौर. इंदौर शहरात असे एक घर आहे तिथे रावणाला मारणे हे त्यांना पटत नाही. शिवाय इंदौर शहरात परदेशी पुरा क्षेत्रात अर्जुन गोहर नगरात रावणाचे एक मोठे मंदिर सुद्धा आहे. या दरम्यान इंदौर मधील बरेच जण दसऱ्यानिमित्त या दिवशी या मंदिरात जाऊन रावणाची होम- भवन करत पूजा करतात. माळव्यात म्हणजे आताच्या मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये एके ठिकाणी रावणाची 400 वर्षांपूर्वीची मूर्ती आहे. मंदसौर जिल्ह्यात खानपुरा इथे या रावणाची जावई समजून पूजा करतात. नामदेव चिपा समाज या मूर्तीची दसऱ्याला पूजा करतो. असं मानलं जातं की, रावणाची पत्नी मंदोदरीचं माहेर मंदसौरमध्ये होतं. यामुळे रावणाची खानपुरा भागात जमाई राजा म्हणून पूजा केली जाते. येथील लोकं अगदी दिमाखात मोठ्या जल्लोषात रावणाची पूजा करतात.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *