Home » Uncategorized » भाजपा व काँग्रेसने मिळून देशातील नोकऱ्या संपविल्या – ऍड. राहुल मखरे 

भाजपा व काँग्रेसने मिळून देशातील नोकऱ्या संपविल्या – ऍड. राहुल मखरे 

भाजपा-व-काँग्रेसने-मिळून-देशातील-नोकऱ्या-संपविल्या-–-ऍड.-राहुल-मखरे 

इंदापूर – देशातील सर्वच शासकीय संस्था ज्याच्यामध्ये गोरगरीबांच्या मुलांना नोकऱ्या मिळत होत्या. त्या सर्वच कंपन्या भाजपा व काँग्रेस पक्षाने संगनमताने विकल्या. त्यामुळे आता तरुणांना नौकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. सरकारने तरुणांना दीड जीबी डाटा मध्ये गुंतवले आहे. त्यामुळे तरुणांना मुंडके वर करण्यास वेळ नाही. भाजपा आणि काँग्रेसने मिळून देशातील तरुणांच्या नौकऱ्या संपविल्या असा घणाघात बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांनी केला.

इंदापूरमध्ये भारतीय जनता पार्टीवर नाराज झालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांच्या उपस्थितीत बहुजन मुक्ती पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर येथे गुरुवार ( दि. १४ ) रोजी सायंकाळी ७.३० वाजता बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहूल मखरे, इंदापूर विधानसभा प्रभारी संजय शिंदे, कोल्हापूर जिल्हा प्रभारी सिद्धार्थ नागरत्न, कोल्हापूर युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सागर सुतार, नानासाहेब चव्हाण, गौस सय्यद, अल्ताफ मोमीन, राजू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ऍड. राहुल मखरे म्हणाले की, नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊन अशा विविध गोष्टी भाजपाने लोकांना वेठीस धरले. देशाच्या नागरिकांचा मोठा छळ केला. मोदी आणि त्यांच्या सरकारने कोरोनाच्या काळात कोणतीही सुविधा केली नसल्याने, एकूण साडे चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. पेट्रोल, डीझलेचे दर गगनाला भिडवले. अच्छे दिनाचा वादा केला. मात्र केवळ अदानी आणि अंबानी यांना चांगले दिवस आले. करोडो लोकांच्या रोजगार गेला मात्र या बड्या लोकांचे दररोज उत्त्पन्न वाढत होते. हि मोदींची कृपा म्हणायची का, असा खडा सवाल मखरे यांनी केला.

यावेळी इंदापूर विधानसभा प्रभारी संजय ( डोनाल्ड ) शिंदे म्हणाले की, मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या काळात कष्टकरी, मजूर व नागरिकांच्या हाताला काम नाही, तरी देखील घरपट्टी, पाणीपट्टी वर व्याज आकारले जात आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. घनकचरा वर ८ लाख रुपया पर्यंत खर्च येत असताना, २१ लाखांचे बिल काढले जात आहे. नागरिकांनी आपला पैसा कोठे खर्च होतो याचा जाब सत्ताधारी सत्ता भोगत आहे. स्वच्छ भारत अभियान चालू आहे, मग नागरिक शहरात आजारी का पडत आहेत. असा जाब संजय शिंदे यांनी सत्ताधारी पक्षाला विचारला.

यावेळी भाजपाचे कार्यकर्ते यांनी बहुजन मुक्ती पार्टीत प्रवेश केला. यामध्ये अक्षय होळकर, पप्पू सूर्यवंशी, अमर मिसाळ, स्वामी वाघमोडे, दिलीप वाघमोडे, विजय ढावरे, रोहित ढावरे, पप्पु शेख, पवन सूर्यवंशी, अमन मोमीन, ऋषीकेश पवार, सोन्या जगताप, सुरेश वाघमोडे, सुनील मोहिते यांनी प्रवेश केला.

“भाजपाचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात “

बहुजन मुक्ती पार्टीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्याय आम्ही कधीच सहन करीत नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला येथे न्याय दिला जातो. त्यामुळे अनेक नागरिक पार्टीकडे आकर्षित होत आहेत. तसेच इंदापूर शहरातील अनेक भाजपाचे नगरसेवक बहुजन मुक्ती पार्टीच्या संपर्कात असून, लवकरच त्यांचे आपल्या पार्टीत इंनकमिंग होणार आहे. असे सूतोवाच ऍड. राहुल मखरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed