Home » Uncategorized » मंदिरातच गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या; स्थानिकांच्या बेदम मारहाणीमुळे एका हल्लेखोराचा जागीच मृत्यू

मंदिरातच गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या; स्थानिकांच्या बेदम मारहाणीमुळे एका हल्लेखोराचा जागीच मृत्यू

मंदिरातच-गोळ्या-झाडून-निर्घृणपणे-हत्या;-स्थानिकांच्या-बेदम-मारहाणीमुळे-एका-हल्लेखोराचा-जागीच-मृत्यू

दरभंगा: बिहारच्या दरभंगामध्ये एका पुजाऱ्याची मंदिरातच गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरभंगातील राज संकुलात असलेल्या कंकाली मंदिराचे मुख्य पुजारी राजीव कुमार झा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आज पहाटे 4.30 च्या सुमारास राजीव झा पूजा करत असताना हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 हल्लेखोर कारमधून मंदिरात आले होते. मंदिरात प्रवेश करुन त्यांनी राजीव झा यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि पळ काढला. यादरम्यान दर्शन करण्यासाठी आलेल्या एका भक्तालाही गोळी लागली. या हल्ल्यानंतर पळून जात असताना स्थानिकांनी 3 हल्लेखोरांना पकडलं तर एक हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला.

स्थानिकांनी हल्लेखोरांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत एका हल्लेखोराचा मृत्यू झाला तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, जखमी भक्ताला पारस रुग्णालयात तर दोन आरोपींना डीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारुबंदीनंतर संध्याकाळपासून मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अंमली पदार्थांचे व्यसन करण्यास गर्दी होते. त्यापैकी एकाने कॉल करण्यासाठी पुजाऱ्याच्या भाच्याकडे मोबाइल मागितला, जो पुजाऱ्याच्या भाच्याने दिला नाही. यावरुन बुधवारी संध्याकाळी पुजाऱ्याच्या पुतण्याचे त्याच्यासोबत भांडण झाले होते. या वादादरम्यान पुजारी राजीव झा दोघांमधला वाद सोडवण्यासाठी आले पण हा वाद एकदम टोकाला गेला. याच वादामुळे झा यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *