Home » Uncategorized » VIDEO – छोट्याशा मेहुणीने केली भलीमोठी डिमांड, नवरदेवालाही फुटला घाम

VIDEO – छोट्याशा मेहुणीने केली भलीमोठी डिमांड, नवरदेवालाही फुटला घाम

video-–-छोट्याशा-मेहुणीने-केली-भलीमोठी-डिमांड,-नवरदेवालाही-फुटला-घाम

नवरीपेक्षाही नवरदेवाला भारी पडली मेहुणी.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

    मुंबई, 14 ऑक्टोबर : लग्नात (Wedding video) नवरदेवाला (Groom video) आपल्या लग्नाचा जितका उत्साह असतो, तितकंच टेन्शन असतं ते मेहुणीचं (Sister in law). नवरदेवाला त्रास देण्याची एक संधी मेहुणी सोडत नाही. लग्नात (Bride video) नवरीच्या बहिणीला (Bride’s sister) म्हणजे मेहुणीला खूप मान असतो. लग्नातील काही विधी, परंपरा, खेळात ती पुढाकार घेते आणि त्यावेळी तिला शगुन द्यावा लागतो. मेहुण्या अशी संधी बिलकुल सोडत नाही. नवरदेवाचा खिसा चांगलाच कापतात. सध्या अशाच एका मेहुणीचा (Jija saali video) व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जी तशी दिसायला लहान आहे पण तिने केलेली डिमांड मात्र भारी आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अशीच ही नवरदेवाची छोटीशी मेहुणी. अगदी मोठ्या तरुणीही मागणी करणार नाही, अशी डिमांड या छोट्याश्या मेहुणीने केली. तिची डिमांड ऐकून नवरदेवाला अक्षरशः घाम फुटला. पाहुणे आणि नातेवाईकही थक्क झाले. आता तुम्ही म्हणाल असं या मेहुणीने मागितलं तरी काय? तर तिने चक्क लाखो रुपयांची डिमांड केली आहे. ही मेहुणी आपल्या दाजींकडून एक लाख रुपये मागताना दिसते. आकडा ऐकून तर नवरदेवाला चक्करच आली. त्याने डोक्यालाच हात लावला.

    व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी शेजारी शेजारी बसले आहेत. त्यांच्यासमोर एक लहान मुलगी आहे, जी नवरीची बहीण म्हणजे नवरदेवाची मेहुणी आहे. त्यांच्याभोवती नातेवाईक, पाहुणे, मित्र परिवारही जमलेले आहेत. ही मुलगी नवरदेवाकडून एक लाख रुपये मागते आणि नवराही हडबडतो. हे वाचा – VIDEO – मेहुणीला पाहून दाजीचा सुटला ताबा; असं काही केलं की पाहुणेही पाहतच राहिले नवरा आपल्या मेहुणीला सांगतो की अगं माझा खर्च वाढला आहे उत्पन्न नाही. नवरीलाही तो म्हणतो तिचा आकडा तर ऐक, तिला समजाव. शेवटी नवरी नवरदेवाच्या मदतीला येते. ती आपल्या बहिणीला काहीतरी डिस्काऊंट दे असं सांगते. नवरदेवही तिला काही पैसे कमी कर म्हणून विनवणी करतो. तेव्हा ती मुलगी 95 हजारांवर येते. पण तरी रक्कम मोठीच आहे. हळूहळू करून ती 51 हजार आणि मग 22 हजारांवर येते. तेव्हा कुठे नवरदेवाच्या जीवात जीव येतो. तो 22 हजार रुपये द्यायला तयार होतो. हा आपला लकी नंबर आहे. शिवाय ही त्याच्या वाढदिवसाची तारीखही असल्याचं नवरी सांगते. म्हणून नवरदेव लाडक्या मेहुणीला 22 हजार रुपये द्यायला आनंदाने तयार होतो. हे वाचा – ‘माणसांना पंख असते तर..’; चिमुकल्याने चक्क घारीसारखी घेतली भरारी; पाहा VIDEO दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा लग्नाचा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या दाजींना हा व्हिडीओ टॅग करा आणि तयार राहण्यासाठी सांगा, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. नेटिझन्सना हा व्हिडीओ भलताच आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *