Home » Uncategorized » दूध उत्पादकांसाठी खुशखबर! दसऱ्यापूर्वीच ‘गोकुळ’ची दिवाळी भेट

दूध उत्पादकांसाठी खुशखबर! दसऱ्यापूर्वीच ‘गोकुळ’ची दिवाळी भेट

दूध-उत्पादकांसाठी-खुशखबर!-दसऱ्यापूर्वीच-‘गोकुळ’ची-दिवाळी-भेट

कोल्हापूर – कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही म्‍हैस व गाय दूध दरफरकापोटी ८३ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये इतकी रक्‍कम प्राथमिक दूध संस्‍थांच्‍या खात्‍यावर १४ ऑक्टोबर २०२१ जमा करणार असल्‍याची माहीती गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी दिली.

संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस दूध दरफरक दिला जातो. त्‍याप्रमाणे यावर्षी संघाने म्‍हैस दुधाकरीता ४९ कोटी ५३ लाख २ हजार रुपये तर गाय दुधाकरीता २१ कोटी ५० लाख १८ हजार रुपये इतका दूध दरफरक व त्‍यावरील ६ टक्के प्रमाणे होणारे व्‍याज २ कोटी ८६ लाख ७४ हजार रुपये व डिबेंचर्स व्‍याज ६.५० टक्के प्रमाणे ४ कोटी ५७ लाख ८९ हजार रुपये व शेअर्स भांडवलवर ११ टक्के प्रमाणे डिव्हीडंड ५ कोटी ३३ लाख ६५ हजार रुपये असे एकूण ८३ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये इतकी रक्‍कम दूध बिलातून दूध संस्‍थांच्‍या खात्‍यावर बँकेत जमा केली जाणार आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांचे मार्गदर्शन व सभासद दूध संस्‍था तसेच दूध उत्‍पादक यांच्‍या सहकार्यामुळे ‘गोकुळ’ची यशस्‍वी वाटचाल सुरू ठेवू शकलो आहोत. याहीपुढे ती आम्‍ही चालू ठेवू याकरिता दूध संस्‍था व उत्‍पादकांचे सहकार्य मोलाचे असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

1 thought on “दूध उत्पादकांसाठी खुशखबर! दसऱ्यापूर्वीच ‘गोकुळ’ची दिवाळी भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *