Home » Uncategorized » स्कॉटलंडच्या सरोवरात रहस्यमय सैतान

स्कॉटलंडच्या सरोवरात रहस्यमय सैतान

स्कॉटलंडच्या-सरोवरात-रहस्यमय-सैतान

एडिनबर्ग –  स्कॉटलंड या देशात नेहमीच सैतान आणि भुताखेतांच्या गोष्टी प्रचलित होत असतात देशातील एका सरोवरामध्ये सैतानाचे वास्तव्य असल्याची चर्चा कित्येक वर्ष सुरु होती आता पुन्हा एकदा ह्या सरोवरातील सैतानाचे चित्र समोर आले असून गुगलवर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या एका फोटोग्राफरने सरोवरातील सैतानाचा व्हिडिओ पोस्ट केल्याने या सैतानाची चर्चा सुरू झाली आहे.

हा व्हिडिओ ड्रोन कॅमेरा च्या साह्याने घेण्यात आला असून त्यामध्ये पाण्याखाली एक रहस्यमय हालचाल होताना दिसत आहे रिचर्ड मेवर नावाचा हा फोटोग्राफर आपल्या यूट्यूब चैनलसाठी या सरोवरावर व्हिडीओग्राफी करत असताना अचानक त्याच्या कॅमेरा मध्ये या हालचाली कैद झाल्या रिचर्डने या छायाचित्रांना झूम करून बघितले असता त्याला पाण्याखाली एक मोठी काळी सावली असल्याचे आढळते.

या सावलीच्या आसपास इतर कोणतीही वस्तू नव्हती रिचर्डने हा व्हिडीओ पोस्ट केला तेव्हा अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत असताना अशा प्रकारच्या सैतानी हालचाली यापूर्वीही या सरोवरात आढळल्याचे अनेकांनी सांगितले सर्वात प्रथम अनेक वर्षांपूर्वी म्हणजेच 2 मे 1933 रोजी या सरोवरात या प्रकारचा जीव आढळून आल्याचे सांगितले जाते.

अनेकांना या सरोवरामध्ये अशा प्रकारच्या रहस्यमय हालचाली दिसल्या अनेकांना फक्त एखादी मोठी काळी आकृती दिसली तर काही लोकांना व्ही किंवा त्रिकोणी आकारातील एक आकृती दिसली परिसरातील काही स्थानिक नागरिकांनी या रहस्यमय जीवाला पाण्याच्या बाहेर येऊन पाहिल्याचा ही दावा केला आहे.

मात्र हा ताजा व्हिडीओ पोस्ट करणारा रिचर्डच्‍या मते यामध्ये कोणताही रहस्यमय प्रकार नसेल कोणत्यातरी एखाद्या नैसर्गिक कारणांमुळेच पाण्याखाली हा विचित्र आकार तयार झाला असू शकतो असे त्याचे म्हणणे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *