Home » Uncategorized » मोबाईलमध्ये गुंतलेली पिढी बाहेर काढण्यासाठी “खेळ’ महत्वाचा – आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड

मोबाईलमध्ये गुंतलेली पिढी बाहेर काढण्यासाठी “खेळ’ महत्वाचा – आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड

मोबाईलमध्ये-गुंतलेली-पिढी-बाहेर-काढण्यासाठी-“खेळ’-महत्वाचा-–-आंतरराष्ट्रीय-कुस्ती-पंच-दिनेश-गुंड

केळगांव – मोबाईल आणि टीव्हीच्या जाळ्यात गुंतलेली पिढी बाहेर काढण्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी मैदानी खेळ खुप म्हत्वाचे आहेत. शालेय विद्यार्थांनी कुस्ती, हाॅलिबाॅल, बास्केटबाॅल, फुटबाॅल, बॅडमिंटन यांसारखे खेळ खेळले पाहिजे. खेळाने शरिर तंदरुस्त होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून नोकरीसाठी आरक्षण मिळवता येते. त्यामुळे पालकांनीही आपल्या मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहीत केले पाहिजे, असे प्रतिपादन आंतराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांनी केले. ते केळगाव येथे आयोजित चर्चासत्रात बोलत होते.

गुंड म्हणाले, सध्याची पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली आहे. शहरातील फ्लॅट सिस्टिममुळे मुले घराच्या बाहेर पडत नाहीत. त्यांना दुध, ड्रायफ्रुट्स आवडत नाहीत. पिझ्झा, बर्गर आवडतो. त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडत जाते. शरिरामध्ये ताकद राहत नाही. पुढे त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. पूर्वी आळंदी शहरात ज्युडो, कराटेचे क्लासेस चालायचे मात्र आता तेही बंद झाले आहेत, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास गुंड, संदीप गुंड, नितीन शेलार, विशाल मुंगसे, आरती गांधी, राष्ट्रीय खेळाडू रेणूका महाजन, आश्वीनी मुंडे, इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे, अनिल जोगदंड, हनुमान घोंगडे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed