Home » Uncategorized » मुंबई पोलिसांना आणखी एक हादरा; क्राईम ब्रँचमध्ये २ लाखांची लाच घेताना सहाय्यक निरीक्षकाला अटक

मुंबई पोलिसांना आणखी एक हादरा; क्राईम ब्रँचमध्ये २ लाखांची लाच घेताना सहाय्यक निरीक्षकाला अटक

latest-newsTop Newsमुख्य बातम्या

By प्रभात वृत्तसेवा

मुंबई : मुंबई क्राईम ब्रँचमध्ये लाचखोरीची  आणखी एक  घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिसांना चांगलाच हादरा बसला आहे. बीएमडब्ल्यू कार चोरीतील आरोपीवर कारवाई न करण्यासाठी २ लाखांची  लाच घेताना मुंबई क्राईम ब्रँचच्या मालमत्ता कक्षातील सहाय्यक निरीक्षक नागेश अंबादास पुराणिक याला रंगेहाथ पकडले आहे.

अंबादास पुराणिकवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे. पुराणिकने काही दिवसांपूर्वी याच कारणासाठी ४ लाख घेतले होते. त्यानंतर पुन्हा एकदा २ लाखांची मागणी केल्यानंतर पूर्णपणे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

acceptingAnother shockarrestedAssistant inspector

Prev Post

‘गरिबाच लेकरू ५०० कि. मी. ला जाऊन आता घरी जातंय.. त्याची माय १५० रोजान शेतात जाती’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *