Home » Uncategorized » Antim: सलमान खानच्या'अंतिम'ची मोठी अपडेट; वाचा चित्रपट कधी होणार Release

Antim: सलमान खानच्या'अंतिम'ची मोठी अपडेट; वाचा चित्रपट कधी होणार Release

antim:-सलमान-खानच्या'अंतिम'ची-मोठी-अपडेट;-वाचा-चित्रपट-कधी-होणार-release

‘अंतिम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या महेश मांजरेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पार्शवभूमीवर आधारित आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 25 सप्टेंबर- बॉलिवूड (Bollywood) दबंग सलमान खानच्या(Salman Khan) चित्रपटाची चाहत्यांना मोठी प्रतीक्षा लागून असते. सलमानचा आगामी चित्रपट ‘अंतिम’(Antim) सुद्धा सतत चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याची बहीण अर्पिताचा पती आणि अभिनेता अर्पित शर्मासुद्धा दिसून येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झाला होता. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकला आणखी वाढली होती. सलमान खान यामध्ये नव्या अंदाजात दिसून येत आहे. त्यामुळे चाहते मोठ्या उत्सुकतेने या चित्रपटाच्या रिलीज डेटची प्रतीक्षा करत आहेत. नुकताच चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल (Release Date) एक मोठी अपडेट समोर आली आहे.

  ‘अंतिम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या महेश मांजरेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पार्शवभूमीवर आधारित आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकताच एका पोर्टलला मुलाखत दिली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे, ‘महाराष्ट्रामध्ये सर्व चित्रपटगृहे जर ऑक्टोबर पर्यंत उघडली जात असतील. तर आम्ही हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित करू. तसेच हा चित्रपट महाराष्ट्राच्या भूमीवर आधारित आहे’. (हे वाचा:‘आम्ही अजून लग्न नाही केलं…’ म्हणत सलमानने केला आपल्या Longest रिलेशनशिपचा…) अभिनेता सलमान खानसहित अन्य कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर या चित्रपटाचं पाहिलं पोस्टर रिलीज केलं होतं. यामध्ये सलमान खानचा नवा लूक दिसून येत होता. शिवाय सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असल्याचं पोस्टरवर दिसलं होतं. त्यामुळे चित्रपटात या दोघांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत होतं. तसेच चित्रपटात सलमान खान एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दबंगप्रमाणे या चित्रपटातही सलमानचा पोलीस लूक पाहायला मिळणार आहे. तसेच आयुष शर्मासाठी हा चित्रपट खूप महत्वाचा असणार आहे. कारण आयुषने आत्तापर्यंत आपल्या चित्रपटातुन हवी तशी प्रसिद्धी मिळवली नाही. या चित्रपटामुळे त्याला बॉलिवूडमध्ये स्थिर होण्यासाठी एक चांगली संधी मिळू शकते. तसेच हा चित्रपट हिट ठरला तर त्याच्या करिअरला कलाटणी मिळणार हे नक्की. (हे वाचा:आमिर खानचा ‘Lagaan’ होता चीनमध्ये प्रदर्शित होणारा पहिला बॉलिवूड चित्रपट) ‘अंतिम’ चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस मराठी’ होस्ट करत आहेत. या शोचं हे तिसरं पर्व आहे. शोच्या पहिल्याच दिवसापासून घरात राडे होताना दिसून येत आहेत. यावर विकेंडला महेश मांजरेकरांची कशी प्रतिक्रिया असणार पाहणे उत्सुकतेचं असणार आहे. दरम्यान महेश मांजरेकर अनेक दिवस कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियासुद्धा करण्यात आली आहे. आत्ता त्यांची प्रकृती एकदम स्थिर आहे. त्यामुळेच त्यांनी बिग बॉस होस्ट करण्याचा निर्णय घेतला होता.

  Published by:Aiman Desai

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *