Home » Uncategorized » चवताळलेली मगर पाण्यातून बाहेर रस्त्यावर आली आणि…; धडकी भरवणारा VIDEO

चवताळलेली मगर पाण्यातून बाहेर रस्त्यावर आली आणि…; धडकी भरवणारा VIDEO

चवताळलेली-मगर-पाण्यातून-बाहेर-रस्त्यावर-आली-आणि…;-धडकी-भरवणारा-video

रस्त्यावर पाण्यात दबा धरून बसली होती मगर आणि…

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

    मुंबई, 24  सप्टेंबर : एखाद्या गाढ झोपलेल्या माणसाला तुम्ही अचानक उठवलं तर? एखाद्या शांत बसलेल्या कुत्रा किंवा मांजराच्या शेपटीवर तुम्ही पाय दिला तर? माणूस असो वा प्राणी ते शांत असताना आपण जेव्हा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते चवताळताच. विचार करा माणूस, कुत्रा, मांजर यांच्या जागी हा शांत असलेला प्राणी मगर (Crocodile) असेल तर? अशाच एका चवताळलेल्या मगरीचा व्हिडीओ (Crocodile video)  सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. रस्त्यावर साचलेल्या एका पाण्यात मगर (Crocodile in water)  होती. ही मगर पाण्यात शांत होती (Crocodile on road) . पण तिला पाण्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना ही मगर अचानक चवताळली आणि पाण्यातून बाहेर रस्त्यावर आली. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे.

    @nature27_12 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या वडोदरातील असल्याचं सांगितलं जातं आहे. इथं रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि त्यामध्ये एक मगर होती. तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. हे वाचा – पाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता, दोन व्यक्ती एका हातात काठी घेऊन एका जिन्यावर उभ्या आहेत. ती काठी त्यांनी पाण्यात घातली आहे. पाण्यातून काहीतरी काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. जशी त्यांनी पाण्यात काठी मारली तशी पाण्यात हालचाल झाल्याचं दिसलं. त्या दोन्ही व्यक्ती घाबरून मागे झाल्या. थोड्या वेळाने त्या पाण्यात दिसली ती मगर. त्या व्यक्तींनी काठी मारून पाण्यात शांत बसलेल्या मगरीला जागवलं होतं. त्यानंतर मात्र ही मगर चवताळली. ती पाण्यात फिरत पाण्यावर उसळू लागली. तिथं बरेच लोक जमले होते. पाण्यातून बाहेर येत तिने लोकांकडे पाहून आपला भलामोठा जबडाही उघडला. त्यानंतर ती हळूहळू पाण्यातून रस्त्यावर आली. हे वाचा – दगड समजून चक्क मगरीवरून चालली कोंबडी; तोंडाजवळ येताच… VIDEO पाहून तुम्ही उडाल व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. सुदैवाने याचदरम्यान या मगरीच्या गळ्यात दोरी अडकवण्यात आली आणि तिला पकडण्यात आल्याचं दिसतं आहे. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. पुराच्या पाण्यातून मगर नदीतून रस्त्यावर येणं तसं नवीन नाही. याआधी बऱ्याच वेळा सांगलीतही रस्त्यावर, छतावर अशा मगरी आढळल्या आहेत. कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मगरीचे मोठ्या प्रमाणात वास्तव आहे. पूर येताच या नदी पुराच्या पाण्यासह नागरी वस्तीत येतात.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *