Home » Uncategorized » राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : वैष्णवी सातवने पटकावले सुवर्णपदक

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : वैष्णवी सातवने पटकावले सुवर्णपदक

राष्ट्रीय-बॉक्सिंग-स्पर्धा-:-वैष्णवी-सातवने-पटकावले-सुवर्णपदक

वाघोली (प्रतिनिधी) : हरियाणातील रोहतक येथे आयोजित ७ व्या स्टुडंट ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये वाघोली येथील बीजेएस कॉलेजची विद्यार्थिनी वैष्णवी दत्तात्रय सातव हीने बॉक्सिंगमध्ये ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे व राष्ट्रीय बॉक्सिंग संघात पात्र ठरली आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

वैष्णवी सातव हीने यापूर्वी युनिवर्सिटी स्तरावर बॉक्सिंग स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली आहे. तिच्या यशामध्ये प्रशिक्षक व कुटुंबाचा मोलाचा वाटा असून वाघोली, आव्हाळवाडी परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे. आशिया स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मानस वैष्णवी सातव हिने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *