Home » Uncategorized » Pune Crime : दहशत माजविण्यासाठी येरवड्यात टोळक्याचा राडा, 14 वाहनांची तोडफोड

Pune Crime : दहशत माजविण्यासाठी येरवड्यात टोळक्याचा राडा, 14 वाहनांची तोडफोड

pune-crime-:-दहशत-माजविण्यासाठी-येरवड्यात-टोळक्याचा-राडा,-14-वाहनांची-तोडफोड

पुणे – दहशत माजविण्यासाठी हातात तलवार, रॉड आणि कोयते घेउन आलेल्या टोळक्याने येरवड्यातील प्रतीकनगरमध्ये १४ वाहनांची तोडफोड केल्याची घटना २२ सप्टेंबरला रात्री नउच्या सुमारास घडली. त्यानंतर टोळके दुचाकीवरून पसार झाले. तोडफोडीत प्रत्येकी दोन रिक्षा आणि मोटारींसह १० दुचाकींचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अब्दुल सय्यद (वय ५१, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक पी. ए. खटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यद यांचे जनरल स्टोअर असून ते काल रात्री दुकानात बसले होते. त्यावेळी दहशतीसाठी हातात तलवारी, रॉड आणि कोयते घेउन आलेल्या १२ ते १५ जणांच्या टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड करण्यात सुरूवात केली.

त्यामध्ये टोळक्याने १० दुचाकी दोन मोटारी आणि दोन रिक्षांचे नुकसान केले. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशतीसाठी मोठमोठ्याने आरडाओरड करीत दहशत माजविली. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती खटेक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *