Saturday, July 24, 2021
Homeताज्या बातम्याभारतीय सीमेजवळून धावणार चीनची बुलेट ट्रेन

भारतीय सीमेजवळून धावणार चीनची बुलेट ट्रेन

बीजिंग – चीनची बुलेट ट्रेन यावर्षी सुरु होत असून ती भारतीय सीमेजवळून धावणार आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीन तिबेटपर्यंत बुलेट ट्रेन चालवण्यास सुरुवात करेल. वर्ष 2020 मध्येच 435 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजेच चीनने तिबेटमधील ल्हासापर्यंत बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी पूर्ण केली आहे. ही ट्रेन चीनच्या जवळपास सर्व प्रांतांतून जाईल. चीनने 2025 पर्यंत हाय-स्पीड ट्रेनचे जाळे 50,000 किमीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

एकीकडे चीन सीमेवरील वाद मिटविण्यासाठी भारताशी लष्करी आणि मुत्सद्दी चर्चा करीत आहे. कारण अद्याप लडाखमधील गोग्रा, हॉट स्प्रिंग, डेमचॉक आणि देप्सांग या दोन देशांमधील चर्चा सुरू आहे. दुसरीकडे त्याच्या षडयंत्रांची व्याप्तीही वाढत आहे. लांबलचक सीमा विवाद आणि तणाव असतानाही चीन सीमावर्ती भागात वेगाने पायाभूत सुविधा विकसित करीत आहे आणि आता चिनी बुलेट ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने तिबेटकडे धावणार आहे.

दुसरीकडे मंगळवारी चीनने आपली हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेन सुरू केली. या ट्रेनची कमाल वेगमर्यादा 600 किमी प्रतितास आहे. जमिनीवर धावणारं हे सर्वात वेगवान वाहन आहे. चीनच्या किनारपट्टीवरील किनिंगडॉ शहरात सार्वजनिकरित्या नवीन मॅग्लेव्ह परिवहन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

ऑक्‍टोबर 2016 मध्ये हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेन प्रकल्प सुरू झाला होता. आता तो पूर्णत्त्वास जात आहे. वर्ष 2019 मध्ये 600 किलोमीटर प्रतितास वेगाच्या या गाडीचा एक नमुना तयार करण्यात आला होता. त्याची यशस्वी चाचणी जून 2020 मध्ये झाली होती.

या ट्रेनमध्ये 10 कोच बसविता येतील, असे प्रकल्पाचे मुख्य अभियंता डिंग सन्सन यांनी सांगितले. प्रत्येकाची क्षमता 100 प्रवाशांची असेल. ते म्हणाले की ही ट्रेन 1,500 किमीच्या परिघामध्ये प्रवास करण्यासाठी उत्तम उपाय आहे. पारंपरिक गाड्यांप्रमाणेच मॅग्लेव्ह रेल्वेची चाके रेल ट्रॅकच्या संपर्कात येत नाहीत.

Maharashtra Maza News Deskhttps://maharashtramazanews.com
सगळ्याचं क्षेत्रातील बातमी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी 'महाराष्ट्र माझा न्यूज ' टिम तत्पर आहे. काळानुसार राहा अपडेट फक्त एका क्लीकवर !
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments