Home » ताज्या बातम्या » Pfizer : करोना प्रतिबंधक लशीचा ‘साईड इफेक्ट’; दुसरा डोस घेतल्यापासून एक डोळा बंद होईना

Pfizer : करोना प्रतिबंधक लशीचा ‘साईड इफेक्ट’; दुसरा डोस घेतल्यापासून एक डोळा बंद होईना

pfizer-:-करोना-प्रतिबंधक-लशीचा-‘साईड-इफेक्ट’;-दुसरा-डोस-घेतल्यापासून-एक-डोळा-बंद-होईना

लंडन – जगभरात करोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. लाखो लोकांना करोनामुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये करोना लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. काही देशात लसीकरण मोहिम अखेरच्या टप्प्यात आहे. त्याचवेळी लसीकरणाचे दुष्परिणाम समोर येत आहेत.

करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर कुणाला ताप येतो, स्नायूंमध्ये वेदना, लस घेतलेल्या भागाला सूज आणि वेदना, अशक्तपणा अशी लक्षणं दिसू लागतात. पण काही प्रकरणात गंभीर परिणामही समोर येत आहेत. करोना लस घेतलेल्या एका व्यक्तीचं संपूर्ण शरीर पाच तासांच्या आत पॅरालाइझ झालं.

६१ वर्षीय व्यक्ती इंग्लंडची असून त्यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. मात्र दुसऱा डोस घेतल्यानंतर त्यांची प्रकृती आणखीच बिघडली आहे. त्यांनी फायझरची लस घेतली आहे.

‘द सन’च्या रिपोर्टनुसार फायझरची लस घेतल्यानंतर या व्यक्तीची प्रकृती बिघडली. दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याचा एक भाग पॅरालाईझ झाला. तर एक डोळा पूर्णपणे बंद होत नाही. त्यांना बेल्स पाल्सी झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे.

‘बेल्स पाल्सी’ हा शरीरातल्या स्नायूंशी निगडित असलेला अर्धांगवायूसदृश विकार आहे. बेल्स पाल्सीमध्ये चेहरा एका बाजूने लटकल्यासारखा होतो. पेशंटला गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो.

तज्ज्ञांच्या मते, शरीरात प्रवेश केलेल्या विषाणूशी संघर्ष करण्यासाठी शरीराची जी प्रतिकार यंत्रणा काम करते, तिच्या ओव्हर रिअॅक्शनमुळे चेहरा किंवा विशिष्ट अवयव सुजतो. त्याचा परिणाम स्नायूंवर होऊन ते निकामी होतात. मात्र दोन महिन्याच्या आत उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed