Home » ताज्या बातम्या » रशियाकडून झिरकॉन क्षेपणास्त्राची चाचणी

रशियाकडून झिरकॉन क्षेपणास्त्राची चाचणी

रशियाकडून-झिरकॉन-क्षेपणास्त्राची-चाचणी

मॉस्को – रशियाने आज झिरकॉन हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाली असल्याचे रशियाच्या संरक्षण दलाच्यावतीने सांगण्यात आले.

रशियाच्या उत्तरेकडी पांढऱ्या समुद्रातील ऍडमिरल ग्रोशकोव या छोट्या बेटावरून ही चाचणी घेण्यात आली आणि या क्षेपणास्त्राने 350 किलोमटर अंतरावरील बॅरेन्ट समुद्राच्या किनाऱ्यावरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला, असे असे रशियाचे संरक्षण मंत्रालयाने आज सांगितले.

हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा किमान 9 पट अधिक वेगाने उडू शकते आणि त्याची मारक क्षमता तब्बल 1 हजार किलोमीटर इतकी आहे, असे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी सांगितले.

या क्षेपणास्त्राची यापूर्वीची चाचणी गेल्यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये पुतीन यांच्या वाढदिवशी घेण्यात आली होती. पुतीन यांनी ही यशस्वी चाचणी म्हणजे देशासाठी मोठी उपलब्धी असे म्हटले होते.

देशाच्या लष्कर आणि नौदलाला या क्षेपणास्त्राचा मोठा फायदा होणार आहे. या क्षेपणास्त्राची तुलना केली जाऊ शकणार नाही, त्यामुळे रशियाची संरक्षण सिद्धता दीर्घकाळ राखली जाईल, असा विश्‍वासही पुतीन यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.