Home » ताज्या बातम्या » Dasra Melava In Shivaji Park: “आमच्या त्यांना शुभेच्छा’; उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Dasra Melava In Shivaji Park: “आमच्या त्यांना शुभेच्छा’; उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

dasra-melava-in-shivaji-park:-“आमच्या-त्यांना-शुभेच्छा’;-उद्धव-ठाकरे-गटाला-परवानगी-मिळाल्यानंतर-देवेंद्र-फडणवीसांची-प्रतिक्रिया

मुंबई – अनेक दिवसांच्या वादानंतर अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, न्यायालयाचा निर्णय आहे. न्यायालयाने सांगितले त्याप्रमाणे प्रशासन नियम पाळेल. गृह विभाग कायदा आणि सुव्यवस्था पाळणार आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

तसेच शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी म्हंटले की, न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. त्याशिवाय आम्ही आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घेऊ, ते त्यांचा दसरा मेळावा घेतील. काळजी करण्याचं कारण नाही. आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होईल. आम्ही आमची तयारी सुरु केली आहे. आमचा कार्यक्रम होईल, त्यांचा ते करतील.

Leave a Reply

Your email address will not be published.