Home » ताज्या बातम्या » अखेर घाबरत रडत आशुतोष व्यक्त करणार अरुंधतीवरचं प्रेम; मालिकेत ट्विस्ट

अखेर घाबरत रडत आशुतोष व्यक्त करणार अरुंधतीवरचं प्रेम; मालिकेत ट्विस्ट

अखेर-घाबरत-रडत-आशुतोष-व्यक्त-करणार-अरुंधतीवरचं-प्रेम;-मालिकेत-ट्विस्ट

मुंबई, 23 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत सध्या अनेक चढ उतार पाहायला मिळत आहेत. एकीकडे संजना गरोदर असण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोष यांचे सुर जुळताना दिसणार आहेत. अनेक दिवस आपण पाहत होतो की आशुतोष आणि अरुंधती यांना आडून आडून लग्न करण्याचा प्रेम व्यक्त करण्याचा सल्ला देत होते.  आशुतोष देखील त्याचं अरुंधतीवर प्रेम असून ते मान्य करायला आणि प्रेम व्यक्त करायला घाबरत होता. पण आता आशुतोषनं सगळी हिंमत एकवटून अखेर अरुंधतीसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. मालिकेच्या आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे ज्यात आशुतोष अरुंधतीसमोर त्याच्या मनातील सगळ्या भावना बोलून दाखवतो.  आपलं अरुंधतीवर प्रेम आहे हे तिला सांगितलं तर ती आपल्याला सोडून निघून जाऊ नये, बोलणं बंद करू नये यासाठी तो योग्य शब्द शब्द शोधत असतो. अरुंधतीला देखील त्याच्या मनातील घालमेल कळते आणि ती त्याला मनातील बोलायची संधी देते. हेही वाचा – TRP Alert : असं काय घडलं की अरुंधती दीपावर भारी पडली चिमुकली स्वरा? या आठवड्याचा टीआरपी चार्ट आला समोर

‘तुझ्याबरोबर असताना मी संपूर्णपणे तुझ्याच बरोबर असतो आणि तुझ्याबरोबर नसताना सुद्धा मनाने मी तुझ्याच बरोबर असतो’ आणि जर याला प्रेम म्हणत असतील तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो’, असं म्हणत मनातील सगळ्या भावना आशुतोष अरुंधतीसमोर बोलून दाखवतो.  आशुतोषचं प्रेम जाणून घेतल्यावर अरुंधती देखील भारावून जाते. तिच्याही डोळ्यात पाणी येतं. आशुतोषनं अरुंधतीवर असलेलं प्रेम व्यक्त केल्यानंतर आता अरुंधती काय प्रतिक्रिया देणार? ती आशुतोषचं प्रेम स्वीकारणार का? आशुतोष अरुंधतीचं लग्न होणार का? त्याचप्रमाणे अरुंधती ही गोष्ट देशमुख कुटुंबाला सांगणार का? असे अनेक प्रश्न प्रोमो पाहून पडले आहेत. या सगळ्याची उत्तर मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.