Home » ताज्या बातम्या » “Me Too आंदोलनानंतर अनेकदा मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला”, अभिनेत्री तनुश्री दत्ताने सांगितली खळबळजनक कहाणी

“Me Too आंदोलनानंतर अनेकदा मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला”, अभिनेत्री तनुश्री दत्ताने सांगितली खळबळजनक कहाणी

“me-too-आंदोलनानंतर-अनेकदा-मला-जीवे-मारण्याचा-प्रयत्न-झाला”,-अभिनेत्री-तनुश्री-दत्ताने-सांगितली-खळबळजनक-कहाणी

मुंबई – मीं टू आंदोलनामुळे चर्चेत आलेली आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मीं टू प्रकारानंतर मला अनेकदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. तसेच मला घरीच विष देऊन मारण्याचा प्रयत्न देखील झाला असल्याचा धक्कादायक खुलासा या अभिनेत्रीने केला आहे.

तनुश्री दत्ताने एका नव्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. याआधीही अभिनेत्रीने आरोप केले होते होते की, तिच्या आयुष्याला काही झाले तर चित्रपट अभिनेते नाना पाटेकर, त्यांची कायदेशीर टीम आणि त्यांचे बॉलीवूड माफिया मित्र जबाबदार असतील. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर मीं टू अभियानातंर्गत आरोप केले होते त्यानंतर नाना पाटेकर यांनी देखील त्या आरोपांना कायदेशीरपणे उत्तर दिले होते.

आता तनुश्री दत्ताने एका मुलाखतीत सांगितले आहे की, अनेकवेळा तिच्या गाडीच्या ब्रेकशी छेडछाड करण्यात आली होती.त्यानंतर अपघात झाल्याने मला बराच वेळ बेड रेस्ट घ्यावी लागली. तनुश्री दत्ता पुढे म्हणते, ‘माझ्या घरात एक मोलकरीण ठेवण्यात आली होती, जी मला पाण्यात मिसळून काहीतरी प्यायला द्यायची. त्यामुळे माझी तब्येत बिघडू लागली.’ तनुश्री दत्ता 2020 मध्ये भारतात परतली होती आणि तिला चित्रपटांमध्ये काम करायचे होते. असा दावा तिने केला आहे. मात्र कोणीही तिच्यासोबत काम करण्यास तयार नसल्याचे देखील तिने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.