Home » ताज्या बातम्या » तब्बल 22.37 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, व्हेल माशाची उलटी एवढी का महाग?

तब्बल 22.37 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, व्हेल माशाची उलटी एवढी का महाग?

तब्बल-22.37-कोटींची-व्हेल-माशाची-उलटी-जप्त,-व्हेल-माशाची-उलटी-एवढी-का-महाग?

सिंधुदुर्ग, 23 सप्टेंबर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. देवगड समुद्रात व्हेल माशाच्या उलटीची (अंबरनीस) तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाने पवनचक्की गार्डनसमोर सापळा रचून चार संशयित पुरुष व दोन महिलांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांच्याकडे 22 किलो 370 ग्रॅम वजनाचा सुमारे व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थ, जप्त करण्यात आला. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 22 कोटी 37 लाख इतकी असल्याची स्पष्ट झाले आहे.

संशयित आरोपींकडून एक चारचाकी, एक दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींविरोधात कलम 39, 42, 43, 44, 48, 51 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थाच्या सर्व संशयितांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या तस्करी प्रकरणी सिंधुदुर्गात प्रथमच मोठी कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा : सावधान! मुलांमध्ये पसरतोय HMFD आजार, पाहा काय आहेत लक्षणं आणि उपाय Video

व्हेल माशाची उलटी एवढी का महाग?

स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारख किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते.

व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अ‍ॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात.

हे ही वाचा : अपरहणकर्त्याने स्वतःच मुलीला मध्यरात्री घरी आणून सोडलं अन् तिथेच गेला आरोपीचा जीव, अमरावतीत काय घडलं?

सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

 • Buldana Crime : बुलढाण्यात मुलानेच अपहरणाची रचली खोटी कहाणी, पोलिसांकडून पोलखोल

 • टँकरमधील गॅस गळतीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर अजूनही बंद; कधी सुरळित होणार वाहतूक?

 • शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मोदी, शाहांची उपस्थिती? का लांबला मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा?

 • Mumbai ATS NIA : भिवंडीतील 2006 च्या दंगलीतील संशयीत आरोपीच्या घरावर NIA चे छापे, हे साहित्य सापडले

 • ‘बाप कधीही चोरता येत नसतो, बाळासाहेब हे कोणाचे..’; शिंदे गटातील आमदाराने उद्धव ठाकरेंना सुनावलं

 • Mumbai Crime Branch : महाराजा असल्याचा बनाव करत भामट्यांनी मोठ्या उद्योगपतींना लुटलं, पोलिसांची कारवाई

 • Whale vomit Konkan : तब्बल 22.37 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, व्हेल माशाची उलटी एवढी का महाग?

 • phone pe going Karnataka : वेदांता-फॉक्सकॉननंतर आता ‘ही’ कंपनी महाराष्ट्र सोडणार

 • अपरहणकर्त्याने स्वतःच मुलीला मध्यरात्री घरी आणून सोडलं अन् तिथेच गेला आरोपीचा जीव, अमरावतीत काय घडलं?

 • आता घरातच करा शेती, एकाच झाडापासून मिळवा बटाटा, टोमॅटो, वांगी, दुधी आणि मिर्ची, कसं? वाचा

 • रुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द

Published by:Sandeep Shirguppe

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.