Home » ताज्या बातम्या » 46 वर्षांपूर्वी प्रभात : इंडोनेशियन सरकार उलथून पाडण्याचा कट

46 वर्षांपूर्वी प्रभात : इंडोनेशियन सरकार उलथून पाडण्याचा कट

46-वर्षांपूर्वी-प्रभात-:-इंडोनेशियन-सरकार-उलथून-पाडण्याचा-कट

ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी पाऊल

नवी दिल्ली, दि. 22 – ग्राहकांच्या हिताचे रक्षणासाठी लवकरच राष्ट्रीय ग्राहक संरक्षक समिती स्थापन करण्यात येईल, असे केंद्रीय नागरी पुरवठा खात्याचे मंत्री ए. जी. जॉर्ज यांनी आज येथे सांगितले.

ही राष्ट्रीय समिती ग्राहकांच्या गरजांची माहिती गोळा करून ती प्रसारित करील व ग्राहकांमध्ये जागृती निर्माण होण्यास सहाय्य करील तसेच ग्राहक कल्याणाचे काम करील. मक्‍तेदारी व निर्बंधित व्यापार कायदा, जीवनाश्‍यक वस्तू कायद्यात दुरुस्त्या आयएसआय प्रमाणपत्राची खूण आणि वजन व मापे नियंत्रण कायदे करून सरकारने ग्राहकांचे संरक्षण केले आहे.

इंडोनेशियन सरकार उलथून पाडण्याचा कट

जाकार्ता- इंडोनेशियाचे सध्याचे सरकार खाली खेचून अध्यक्षपदी माजी उपाध्यक्ष महंमद हत्ता यांना नेमण्याचा कट उघडकीस आला आहे, असे आज अध्यक्ष सुहार्तो यांनी जाहीर केले.

परराष्ट्रमंत्री जनरल सुहार्मोनो यांनी सांगितले की, कृषि मंत्रालयाचे एक माजी अधिकारी सॅविटो कार्तोवुर्ती हे कटवाल्यांचे म्होरके असल्याचा संशय असून त्यांना इतर 4 जणांसह अटक करण्यात आली आहे. डॉ. हत्ता व इतर 4 धार्मिक नेत्यांचीही या कटाच्या संदर्भात चौकशी चालू आहे. हा कट अयशस्वी झाला असला तरी यापुढे कट शिजण्याची शक्‍यता आहेच.

Leave a Reply

Your email address will not be published.