Home » ताज्या बातम्या » ICC T20 Rankings : भारतीय संघ पहिल्या स्थानावर कायम तर फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार…

ICC T20 Rankings : भारतीय संघ पहिल्या स्थानावर कायम तर फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार…

icc-t20-rankings-:-भारतीय-संघ-पहिल्या-स्थानावर-कायम-तर-फलंदाजांच्या-क्रमवारीत-सूर्यकुमार…

दुबई – भारताचा नवोदित आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याने आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे. यंदाच्या मोसमात भारतीय क्रिकेट संघाने गेल्या सात टी-20 मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघ आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. याचसह टी-20 क्रिकेटमध्ये मोलाची कामगिरी बजावणारा सूर्यकुमार यादव हाही फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

श्रेयस अय्यरने 25 व्या स्थानावरून 19 व्या स्थानावर उडी घेतली असून, इशान किशन व रोहित शर्मा अनुक्रमे 15 व्या व 16 व्या स्थानावर आहेत. टी-20 क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तसेच अफगाणिस्तानचा खेळाडू महंमद नबी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

भारतीय संघ टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर असला तरी फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये भारतीय खेळाडूंची संख्या मात्र कमी आहे. सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या, तर भुवनेश्वर कुमार गोलंदाजांच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. या दोघांव्यतिरिक्‍त एकही भारतीय टी-20 क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंत स्थान मिळवू शकला नाही.

आयसीसीची टी-20 क्रमवारी

फलंदाज

1) बाबर आझम
2) सूर्यकुमार यादव
3) महंमद रिझवान
4) एडन मार्करम
5) डेव्हिड मलान

गोलंदाज

1) जोश हेझलवूड
2) तबरेझ शम्सी
3) रशीद खान
4) अदिल रशीद
5) डम झाम्पा

अष्टपैलू खेळाडू

1) महंमद नबी
2) शकीब अल हसन
3) मोईन अली
4) ग्लेन मॅक्‍सवेल
5) रोहन मुस्तफा

Leave a Reply

Your email address will not be published.