Home » ताज्या बातम्या » Raju shrivastav Health Update: शस्त्रक्रियेनंतरही राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर

Raju shrivastav Health Update: शस्त्रक्रियेनंतरही राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर

raju-shrivastav-health-update:-शस्त्रक्रियेनंतरही-राजू-श्रीवास्तव-व्हेंटिलेटरवर

मुंबई, 11 ऑगस्ट- कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांना काल हृदय झटक्यांनंतर रुग्णालयात दाखल करण्यात होतं. त्यांनतर त्यांची हेल्थ अपडेट समोर येत आहे. राजू यांच्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेज आढळले आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती अस्थिर असल्याचं म्हटलं जात आहे.बुधवारी वर्कआउट करत असताना त्यांना छातीत दुखू लागलं. त्यांनतर ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले होते. त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. येथे तपासणीत त्यांच्या हृदयाच्या मुख्य धमनीत ब्लॉक आढळून आला आहे. अशा स्थितीत डॉक्टरांनी दोन स्टेंट टाकून त्यांच्यवर शस्त्रक्रिया केली आहे. डॉ.अनन्या गुप्ता यांच्या मते, राजू श्रीवास्तव यांची बीपी नियंत्रणात येत नाहीय. सामान्यतः अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाची प्रकृती पूर्वपदावर येते आणि त्याला वॉर्डात हलवले जाते. राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्यानंतरही त्यांची बीपी 80/56 इतकी कायम आहे. त्यामुळे प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याला स्वतःहून श्वास घेता येत नाहीय. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Comedian

Leave a Reply

Your email address will not be published.