Home » ताज्या बातम्या » भीमा कोरेगाव प्रकरण: वरवरा राव यांना जामीन मंजुर

भीमा कोरेगाव प्रकरण: वरवरा राव यांना जामीन मंजुर

भीमा-कोरेगाव-प्रकरण:-वरवरा-राव-यांना-जामीन-मंजुर

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कवी आणि सामाजिक कार्यकर्ते पी वरावरा राव यांना वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा जामीन मंजुर करताना असे निरीक्षण नोंदवले की, सध्या आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामिनावर सुटलेले 82 वर्षीय राव यांची आरोग्य स्थिती एवढी सुधारलेली नाही की त्यांना यापूर्वी दिलेला दिलासा मागे घेण्यात जावा.

खंडपीठाने म्हटले आहे की, त्यांच्या प्रकृतीत पुरेशी सुधारणा झालेली दिसून येत नाही, त्यामुळे त्यांना जामीन मंजुर करावा लागत. आरोपीला वैद्यकीय कारणास्तव जामीनाची सूट मिळण्याचा अधिकार आहे आणि तो राव यांना दिला गेला पाहिजे असा आमचा निर्णय आहे त्यामुळे आम्ही त्यांना जामीन मंजुर करीत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published.