Home » ताज्या बातम्या » सोनं, डायमंड, प्लाटिनमचा साज; देशभर चर्चेत असलेल्या राखीची किंमत ऐकून व्हाल थक्क

सोनं, डायमंड, प्लाटिनमचा साज; देशभर चर्चेत असलेल्या राखीची किंमत ऐकून व्हाल थक्क

सोनं,-डायमंड,-प्लाटिनमचा-साज;-देशभर-चर्चेत-असलेल्या-राखीची-किंमत-ऐकून-व्हाल-थक्क

मुंबई, 10 ऑगस्ट : रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहीण यांच्यातील गोड नात्याचा दिवस. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहीण आनंदात साजरा करतात. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. दुसरीकडे, भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊल बहिणीचं आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. राखीचं या दिवशी मोठं महत्त्व आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या राख्या तुम्हाला पाहायला मिळतील. अशीच एक राखी सध्या देशभर चर्चेचा विषय आहे. या राखीची किंमत जवळपास पाच लाख रुपये आहे. असं काय आहे या राखीमध्ये पाहुया. भारतातील सर्वात महागडी राखी गुजरातमधील सुरत शहरात विकली जात आहे. या राखीची किंमत 5 लाख रुपये आहे. ही राखी सोने, डायमंड, प्लॅटिनमपासून बनवली आहे. ही राखी दागिन्यासारखी दिसत आहे. सुरतमधील या ज्वेलरी शॉपमध्ये हजारो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत राख्यांची विक्री होत आहे. यामध्ये 5 लाख रुपयांपर्यंतच्या राखीचाही समावेश आहे. 5 लाख रुपयांची राखी बनवण्यासाठी सोने, प्लॅटिनम, डायमंड अशा अनेक महागड्या धातूंचा वापर करण्यात आला आहे. या राखीची किंमत देशभर चर्चेचा विषय आहे. यासोबतच सुरतमधील या ज्वेलरी शॉपमध्ये इतरही अनेक प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. या राख्या सोन्या-चांदीने बनवल्या आहेत. ज्वेलरी शॉपचे मालक दीपक भाई चोक्सी यांनी एएनआयला सांगितले की, सामान्य दिवसांमध्ये ही राखी दागिने म्हणून वापरू शकतात. यासोबतच येथे 400 ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या राख्या विकल्या जात असल्याचे दुकान मालकाने सांगितले. काही वर्षापूर्वी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर रेशमी धागा बांधून राखीचा सण साजरा करत असत. पण बदलत्या काळानुसार या सणाचा अर्थही बदलला आहे. आता बाजारात अनेक प्रकारच्या फॅन्सी राख्या उपलब्ध आहेत, ज्यांची किंमतही मोठी आहे.

Published by:Pravin Wakchoure

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Raksha bandhan

Leave a Reply

Your email address will not be published.