Home » ताज्या बातम्या » आधुनिकतेची कास! आधुनिक तंत्रज्ञानातून ड्रोनद्वारे फवारणी

आधुनिकतेची कास! आधुनिक तंत्रज्ञानातून ड्रोनद्वारे फवारणी

आधुनिकतेची-कास!-आधुनिक-तंत्रज्ञानातून-ड्रोनद्वारे-फवारणी

सविंदणेत झेंडू, ऊस क्षेत्राची निवड : पडवळ यांच्या शिवारात प्रात्यक्षिक

सविंदणे – शिरूर तालुक्‍यातील सविंदणे येथील प्रगतशील शेतकरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ यांनी आपल्या शेतात अभिनव प्रयोग करीत शिवारातील झेंडू व 18121 या नवीन प्रजातीच्या उसावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या ड्रोनद्वारे फवारणी केली आहे.

बाळासाहेब पडवळ हे शेतात कायमच नवनवीन प्रयोग यशस्वी करतात. त्यांनी ऊस व इतर पिकांना खत म्हणून सुक्ष्म मूलद्रव्ये पाण्यातून मुळांना तसेच पानांना सुद्धा वरुन फवारणी केली आहे. व्हीएसआयचे वसंत ऊर्जा तसेच मल्टीमायक्रोन्युटिन्ट तसेच इतर कीटकनाशकाची फवारणी त्यांनी पिकांना टॉनिक म्हणून ड्रोनद्वारे केली आहे. हातपंपाद्वारे फवारणी करताना औषधे अंगावर उडतात. त्याचा परिणाम शेतकऱ्यांचा आरोग्यावर होतो. त्यामुळे आरोग्यदायी व वेळेची बचत म्हणून ड्रोनद्वारे फवारणी करणे महत्त्वाचे आहे.

साधारण ड्रोन फवारणीसाठी एकरी आठशे रुपये खर्च येतो. पंधरा मिनिटांत एक एकर फवारणी केली जाते. वसंतदादा शुगर इन्सिट्यूट कृषी विभाग मांजरी येथील अधिकारी तसेच भीमाशंकर मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे व त्यांच्या स्टाफने शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणी करण्याकामी प्रोत्साहित केले आहे.

ड्रोनद्वारे फवारणी केल्यास वेळेची, पैशांची बचत होते. तसेच ऊसवाढ झाल्यास ऊस पिकांना अँसोटोबॅक्‍टर फवारणी करणे आवश्‍यक असते. परंतू ऊस वाढल्यानंतर हातपंपाने उसाची फवारणी करता येत नाही. तसेच जमिनीतून ऊस पिकाला योग्य मुलद्रव्ये मिळत नाही. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी केल्यास उसाच्या पांनामधून मूलद्रव्ये चांगल्या प्रकारे मिळाल्याने उसाची वाढ जोमाने होण्यास मदत होते.
– प्रदीप वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, संचालक.

Leave a Reply

Your email address will not be published.