Home » ताज्या बातम्या » ग्‍लॅमरस लुकसाठी चेहऱ्याच्या 'या' भागांना करा हायलाईट

ग्‍लॅमरस लुकसाठी चेहऱ्याच्या 'या' भागांना करा हायलाईट

ग्‍लॅमरस-लुकसाठी-चेहऱ्याच्या-'या'-भागांना-करा-हायलाईट

मुंबई, 07 ऑगस्ट : आपल्या मेकअप किटमध्ये हायलाइटर हे आवश्यक प्रॉडक्ट आहे. त्याशिवाय स्पेशल मेकअप करणं शक्य नाही. हायलाइटर अनेक शेड्समध्ये उपलब्ध असतो. मात्र, सिल्‍वर, गोल्‍ड आणि रोज टोन सर्वात जास्त वापरले जातात. या सगळ्यांचा कोणत्याही प्रकारच्या त्वचेला टोन करण्यासाठी वापर करता येतो. तुम्ही नवीनच मेकअप करायला शिकत असाल तर हायलाइटरचा वापर नक्की जाणून घ्या. हायलाइटरचा वापर चेहऱ्याच्या फीचर्सना हायलाइट करण्यासाठी केला जातो. याचा विशेषत: चेहऱ्याच्या हाय पॉईंटसला मेकअप करण्यासाठी उपयोग होतो. ज्यामुळे चेहऱ्याला ग्लॅमरस लूकही येतो. नाईट मेकअपसाठी हे एक आवश्यक प्रॉडक्ट आहे. चेहऱ्याच्या कोणत्या पॉईंटसवर याचा उपयोग होतो आणि तुमचा लूक आकर्षक बनू शकतो, त्याविषयी जाणून (How to use Highlighter) घेऊया. चेहऱ्याच्या या भागांवर हायलाइटर लावा चिक बोन – ज्या प्रकारे गालावर ब्लशर वापरला जातो, त्याच प्रकारे गालाच्या हाडांवर हायलाइट लावला जातो. यामुळे आपल्या चेहर्‍याला एक शार्प लुक येतो आणि तुम्ही चांगले दिसू शकता. नोझ प्‍वाइंट – ब्रशच्या साहाय्याने नाकाच्या उंच भागावर हायलाइटर लावा, ज्याला नोझ पॉइंट देखील म्हणतात. यामुळे आपल्या नाकाचा लूक स्पेशल दिसेल आणि ते अधिक टोकदार दिसते. बोटांच्या साहाय्याने तुम्ही नाकावरही लावू शकता. टीजोन एरिया तुमचा सर्व मेकअप पूर्ण झाल्यावर, ब्रश घ्या आणि टीजोन एरियावर हलक्या हातांनी लावा. यामुळे तुमचा लुक फ्रेश दिसेल. चिन हाइलाइट – जर तुम्ही हायलाइटर वापरत असाल तर हनुवटीचा भाग हायलायट करायला विसरू नका. यामुळे आपल्या चेहऱ्या मेकअप अधिक आकर्षक पूर्ण वाटेल. हे वाचा – वजन वाढणं आणि कोलेस्ट्रॉलचा असा आहे संबंध; रिस्क फॅक्टर ओळखून उपाय सुरूच करा क्यूपिड बो – जेव्हा तुम्ही लिपस्टिक लावाल, तेव्हा क्यूपिड बोवर हलक्या हाताने हायलाइटर वापरू शकता. यामुळे आपल्या ओठांचा शेप परफेक्टली डिफाइन केला जाईल आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे फिचर चांगल्या प्रकारे हायलाइट होतील. हे वाचा – Numerology : कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी जरूर वाचा आजचं अंकशास्त्र डोळ्यांचा भाग – डोळे मोठे आणि अधिक आकर्षक दिसायचे असतील तर डोळ्यांच्या इनर कॉर्नरवर याचा उपयोग करा. असे केल्याने डोळे मोठे आणि सुंदर दिसतील. याशिवाय ब्रशच्या मदतीने कपाळाच्या वरच्या भागावरही हायलायटर लावू शकता. असे केल्याने तुमच्या डोळ्याचे आयलिड मोठे आणि तीक्ष्ण दिसतील. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Skin, Skin care, Skin color

1 thought on “ग्‍लॅमरस लुकसाठी चेहऱ्याच्या 'या' भागांना करा हायलाईट

Leave a Reply

Your email address will not be published.