Home » ताज्या बातम्या » #CWG2022 #TableTennis : टेबल टेनिसपटू शरथ-साथियनला दुहेरीत रजतपदक

#CWG2022 #TableTennis : टेबल टेनिसपटू शरथ-साथियनला दुहेरीत रजतपदक

#cwg2022-#tabletennis-:-टेबल-टेनिसपटू-शरथ-साथियनला-दुहेरीत-रजतपदक

बर्मिंगहॅम – भारताची स्टार टेबल टेनिस जोडी अचंथा शरथ कमल व जी साथियन यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत अखेर रजतपदकावर समाधान मानावे लागले. या जोडीकडून यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र, इंग्लंडच्या जोडीविरुद्ध त्यांना खेळ उंचावण्यात अपयश आले.

भारताच्या या जोडीला रविवारी झालेल्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या पॉल ड्रिकहॉल व लियाम पिचफोर्ड जोडीकडून 11-8, 8-11, 3-11, 11-7, 4-11 (3-2) असा पराभव स्वीकारावा लागला. ड्रिकहॉल व पिचफोर्ड या जोडीने सलग दुसऱ्यावेळी सुवर्णपदक पटकावले.

या सामन्यात ड्रिकहॉल व पिचफोर्ड या जोडीने पहिली गेम गमावली. मात्र, दुसरी गेम जिंकत बरोबरी साधली. तसेच तिसरी गेम जिंकत आघाडीही घेतली. भारतीय जोडीने चौथी गेम जिंकली व तुल्यबळ लढत दिली; परंतु इंग्लंडच्या जोडीने आपले वर्चस्व सिद्ध करत पाचव्या गेमसह सामनाही जिंकला व सुवर्णपदकालाही गवसणी घातली.

1 thought on “#CWG2022 #TableTennis : टेबल टेनिसपटू शरथ-साथियनला दुहेरीत रजतपदक

Leave a Reply

Your email address will not be published.