Home » ताज्या बातम्या » अनिल कपूर तैमूरसोबत करणार फिल्म, रोलबाबत स्वतः केला खुलासा

अनिल कपूर तैमूरसोबत करणार फिल्म, रोलबाबत स्वतः केला खुलासा

अनिल-कपूर-तैमूरसोबत-करणार-फिल्म,-रोलबाबत-स्वतः-केला-खुलासा

मुंबई – बॉलीवूड इंडस्ट्रीतील ‘लखन’ अर्थात अनिल कपूर आपल्या दमदार अभिनयासोबत हजरजबाबी पनासाठी देखील प्रसिद्ध आहे. नुकतंच अनिल कपूरनं ‘केस तो बनता है’ या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी सर्व चाहत्यांना अनिल कपूरच्या हजरजबाबीपनासह ह्युमर सेन्सचा देखील अनुभव घेता आला. यावेळी अनिल कपूर यांनी आपण तैमूरसोबत फिल्म करणार असल्याचे सांगितल्यावर तर प्रेक्षकांमध्ये मोठा हशा पिकला.

अनिल कपूर ६५ वयातही अगदी तरुण असल्यासारखे दिसतात. यावरून त्यांना वारंवार प्रश्न देखील विचारले जातात. इंडस्ट्रीतील मित्रांबाबत अनिल कपूरला शोमध्ये विचारले असता त्याने अमिताभ शत्रुघन सिंह असा दिगज्ज कलाकारांसह नव्या पिढीच्या रणवीर सिंग आणि रणवीर कपूरसोबत आपली मैत्री असल्याचे सांगितले.

एवढ्यावरच अनिल थांबला नाही. सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमूरसोबतही खूप मैत्रीपूर्ण असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतरच अनिलने गमतीने म्हंटले की, दोघेही लवकरच एक चित्रपट करणार आहेत, ज्यामध्ये पतौडी घराण्यातील सर्वात तरुण नवाब अर्थात तैमूर हा अनिल कपूरचा वडील बनणार आहे. हे ऐकून कार्यक्रमात उपस्थित सर्वजण तुफान हसले. तरुण दिसण्यावरून आणि फ्रेंडशिपवरून अनिल कपूरने दाखवलेला ह्युमर सेन्स यावेळी सर्वांनाच जाम आवडला

अनिल कपूर नुकताच ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात दिसला होता. सध्या ती संदीप वंगा रेड्डी यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तो रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. रणबीरही या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.