Home » ताज्या बातम्या » काॅंग्रेसच्या आंदोलनावर अमित शहांची प्रतिक्रिया, जोडला राम मंदिराचा संदर्भ, म्हणाले…

काॅंग्रेसच्या आंदोलनावर अमित शहांची प्रतिक्रिया, जोडला राम मंदिराचा संदर्भ, म्हणाले…

काॅंग्रेसच्या-आंदोलनावर-अमित-शहांची-प्रतिक्रिया,-जोडला-राम-मंदिराचा-संदर्भ,-म्हणाले…

नवी दिल्ली  – कॉंग्रेस छुप्या पद्धतीने लांगूलचालनाचे राजकारण करत आहे. राम मंदिर उभारणीला विरोध असल्याचा संदेश देण्यासाठी त्या पक्षाने निदर्शनांसाठी आजचा दिवस निवडला, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. त्यांनी 5 ऑगस्ट ही तारीख आणि वार (शुक्रवार) यांच्याकडे लक्ष वेधले.

महागाई आणि बेरोजगारीचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांनी काळे कपडे परिधान करून निदर्शने केली. त्यावर शहा यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट 2020 या दिवशी राम मंदिराचा शिलान्यास झाला. त्याचा संदर्भ शहा यांनी दिला. राम मंदिर उभारणीचे कार्य वेगात सुरू आहे.

मात्र, कॉंग्रेस जाहीरपणे मंदिराला विरोध करू शकत नाही. त्या विरोधाचा छुपा संदेश तो पक्ष देत आहे. महागाई, ईडीचे मुद्दे केवळ दिखावा आहे. अनेक वर्षे सत्तेत असूनही कॉंग्रेसने राम जन्मभूमीचा वाद सोडवण्यासाठी काहीच केले नाही. पण, मोदींनी शांततामय मार्गाने तोडगा काढला, असेही शहा यांनी म्हटले.

1 thought on “काॅंग्रेसच्या आंदोलनावर अमित शहांची प्रतिक्रिया, जोडला राम मंदिराचा संदर्भ, म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published.