कोरोना काळात रुग्णसेवा देणाऱ्या मास्टर माईंडने आखला कोल्हेंच्या हत्येचा प्लान

या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी शेख इरफान शेख रहिम यांची रहेबर नावाची सामाजिक संघटना आहे.
- Maharashtra Maza News
- Last Updated :
अमरावती, 3 जुलै : अमरावतीचे (Amravati News) पशुवैद्यकीय औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांची नुपूर शर्मा (Nupur Sharma Case) यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी शेख इरफान शेख रहिम यांची रहेबर नावाची सामाजिक संघटना आहे. आरोपी शेख इरफान याच्याकडे रुग्णवाहिका असून तो रुग्णसेवेचं काम करतो, अशी माहिती समोर आली आहे. कोरोना काळात त्याने अनेक रुग्णांना त्याने सेवा सुद्धा दिली होती. मात्र इतके सामाजिक काम करत असतांना उमेश कोल्हे यांची हत्या त्याने का केली? त्यामागं नेमका काय उद्देश होता ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या कटाची बैठकदेखील घेण्यात आली होती. 16 जून रोजी इरफानने ही मीटिंग बोलावली होती. सामाजिक संघटनेच्या आड इरफान तरुणांना गुन्हेगारीत आणण्याचे काम करीत होता का ? याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. सध्या आरोपी इरफानला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या चार दिवसाच्या पोलीस कोठडीत तो कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा करतो याकडे लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इरफानने हत्येच्या कटात 25 वर्षीय मजूर शाहरूख पठाण, 24 वर्षीय अब्दुल तौफिक, 22 वर्षीय शोएब खान आणि 22 वर्षीय आतिब रशीद यांना सामील केलं. संपूर्ण कारस्थान केल्यानंतर 21 जूनच्या रात्री शाहरूख आणि आतिबने उमेशच्या गळ्यात सुरा खुपसला. महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरणी UAPA कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआयएच्या मुंबई कार्यालयात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआयएने नोंदवलेल्या एफआयआरनुसार, या प्रमुख कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. UAPA चे कलम 16, 18, 20 आणि कलम 153(a), 153b, 120b आणि 302 IPC NIA ने UAPA मध्ये अमरावतीच्या आरोपींची नोंद करण्यात आली असून ज्यामध्ये दहशतवादी कायद्याचे कलम देखील जोडले गेले आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Crime news