Home » ताज्या बातम्या » बायडेन यांच्या कुटुंबियांवर रशियाकडून निर्बंध

बायडेन यांच्या कुटुंबियांवर रशियाकडून निर्बंध

बायडेन-यांच्या-कुटुंबियांवर-रशियाकडून-निर्बंध

मॉस्को – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन आणि कन्येसह अन्य 23 जणांवर रशियाने निर्बंध घातले आहेत. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज ही माहिती दिली. रशियामध्ये प्रवेश नाकारण्याच्या यादीमध्ये या 25 जणांचा समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकेने अलिकडेच रशियाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही अशाच प्रकारे निर्बंध घातले आहेत. त्याची प्रतिक्रिया म्हणून रशियानेही बायडेन यांच्या कुटुंबियांसह अन्य काही जणांवर तशाच प्रकारचे निर्बंध घातले आहेत.

रशियाने निर्बंध घातलेल्या व्यक्तींच्यायादीमध्ये अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मेइनच्या सुसन कॉलिन्स, केंटकीचे मिच मॅककॉनेल, आयोवाचे चार्ल्स ग्रासले आणि कर्स्टन गिलिब्रॅंड यांचा समावेश आहे. याशिवाय काही विद्यापिठांचे प्राध्यापक, संशोधक आणि माजी सरकारी अधिकाऱ्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.