Home » ताज्या बातम्या » राशीभविष्य: 3 राशींना आज भाग्य देणार साथ; वाचा तुमचं आजचं भविष्य

राशीभविष्य: 3 राशींना आज भाग्य देणार साथ; वाचा तुमचं आजचं भविष्य

राशीभविष्य:-3-राशींना-आज-भाग्य-देणार-साथ;-वाचा-तुमचं-आजचं-भविष्य

आज दिनांक 31 जुलै शनिवार तिथी आषाढ कृष्ण अष्टमी. मेष, मिथुन, सिंह राशीला दिवस शुभ. वाचा तुमच्या राशीचं भविष्य.

आज दिनांक 31 जुलै शनिवार तिथी आषाढ कृष्ण अष्टमी. मेष, मिथुन, सिंह राशीला दिवस शुभ. वाचा तुमच्या राशीचं भविष्य.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

आज दिनांक 31 जुलै शनिवार  तिथी  आषाढ कृष्ण अष्टमी. आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस समाधानात व शांततेत घालवा. राशीतील चंद्र  आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक स्थितीत  सुधार होणार आहे. दिवस शुभ आहे. वृषभ आज खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. कुटुंबासाठी काहीतरी विशेष  खरेदी  कराल. नोकरीमध्ये तुमच्या साठी  चांगला  दिवस आहे. काम पडले तरी फळ मिळेल. दिवस मध्यम. मिथुन आज तुम्ही तुमच्या कामात व्यग्र रहाल. लाभ होतील. राशीतील सूर्य अधिकार वाढ करेल. मंगळ  शुक्र कुटुंबासाठी खर्च करायला लावेल. फोन येतील. दिवस शुभ आहे. कर्क राशीतील  रवि  अणि धन स्थानातील मंगळ  शुक्र तुमच्यात एक प्रकारचा  रुबाब निर्माण करतील. लोकांवर तुमचा उत्तम प्रभाव पडेल. हाती घेतलेली कामे  नीट पार पडतील. नोकरीमध्ये वरिष्ठ खुश राहतील. सिंह आज भाग्य साथ देणार आहे. मोठ्या जबाबदारीने तुम्ही काम पूर्ण कराल. राशीतील मंगळ व शुक्र थोडा खर्च करेल. कायदा पाळा. चिकाटी आणि परिश्रम वाढणार आहेत. दिवस शुभ. कन्या आज राशीच्या अष्टमात चंद्र आहे. आर्थिक बाजु भक्कम असली तरी कुठेतरी  अशांती, हुरहुर वाटेल. चिंता करू नका. लवकरच चांगले क्षण येतील. दिवस  फार काही अपेक्षा न ठेवता शांतपणे घालवा. तुला भागीदारी, व्यावसायिक निर्णय, आणि जोडीदाराचा योग्य सल्ला असा आजचा दिवस आहे. दशमातील रवि तुमची कामे  सुरळीत मार्गी लावेल. भाग्य साथ देईल. दिवस चांगला आहे. वृश्चिक आज फार मोठे निर्णय किंवा आर्थिक देणेघेणे टाळा. डोळ्याचे त्रास असतील तर लक्ष द्या. कोणाशीही  वाद नको. मात्र तुमचे  सहकारी साथ देतील. दिवस  मध्यम आहे. धनु द्वितीयात शनि अणि पंचमात चंद्र संततीचे प्रश्न निर्माण करतील. आर्थिक स्थिती सांभाळा. स्त्रियांना काही प्रकृतीच्या तक्रारी  असतील तर  लक्ष द्या. गुरू बळ  आहे. दिवस बरा जाईल. मकर आज घरगुती प्रश्न डोकं वर काढतील. कोणाचे आजारपण, कोणाची मदत करावी लागेल. जोडीदाराकडून मदत मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस चांगला आहे. कुंभ आज छोटे प्रवास  ,मौजमजेसाठी खर्च, आणि एखाद्या विशिष्ट कामासाठी महत्त्वाचा फोन असा दिवस आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी बाहेर पडाल. दिवस शुभ. मीन आर्थिक प्राप्ती होईल. त्या बरोबर खर्च उभे राहणारच. तेव्हा चिंता नको. मुलाबाळांसाठी खर्च होणार आहे. घरासाठी नवीन वस्तू , काही धार्मिक गोष्टीची , पूजेची तयारी असा दिवस आहे. शुभम भवतु!!

First published:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed