Home » ताज्या बातम्या » – 'तेरा घमंड चार दिन का है पगले…' संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं

– 'तेरा घमंड चार दिन का है पगले…' संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं

–-'तेरा-घमंड-चार-दिन-का-है-पगले…'-संजय-राऊत-यांनी-भाजपला-फटकारलं

Home /News

/mumbai

/

‘तेरा घमंड चार दिन का है पगले…’ संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं

आज कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणत्याच राज्यकर्त्याने घेतला नसेल.

आज कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणत्याच राज्यकर्त्याने घेतला नसेल.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 19 जून :  ‘विरोधकांना फार घमेंड चढला आहे. राज्यसभेत एक जागा इकडे तिकडे होत असते. फार घमेंड करू नका, एक जागा तुम्ही जिंकली असेल पण सूत्र ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याकडेच राहणार आहे. फार घमेंड करू नका, ‘तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है.’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला सुनावले. शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाषणात भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘बाळासाहेब ठाकरे यांनी एक ठिणगी टाकली होती, त्याचा आज देशभरात वणवा पेटला आहे. आज फादर्स डे आहे, जागतिक स्तरावरचा हा दिवस आहे. तो यूनोने ठरवलेला आहे. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे या देशाला बाप नाही. पण, आज फादर्स डेच्या निमित्ताने सांगू इच्छितो बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व ऑफ फॉदर्स आहे. आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे हेच फादर्स आहे. जे जे लोक हिंदुत्व मानता, ज्यांच्या रोमारोमात हिंदू मानतो, त्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आहे त्या सर्वांचा बाप हे बाळासाहेब आहे आणि बाप एकच असतो, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. (10 वर्ष रस्ता बंद, प्रसूती झालेल्या महिलेला खाटेवर झोपवून पायी नेण्याची वेळ) ’56 वा वाढदिवस नसून हा तुफानाचा वाढदिवस आहे. अबतक 56 नाही, अजूनही बरंच काही पुढे आहे. विरोधकांना फार घमेंड चढला आहे. राज्यसभेत एक जागा इकडे तिकडे होत असते. फार घमेंड करू नका, एक जागा तुम्ही जिंकली असेल पण सूत्र ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. फार घमेंड करू नका, ‘तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है.’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला. ‘संपूर्ण देश आज पेटला आहे. सैन्यात आज कंत्राटीपद्धतीने भरणार आहे. सैन्य हे पोटावर चालणार ऐकले आहे. पण, आज कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणत्याच राज्यकर्त्याने घेतला नसेल. तुघलक सुद्धा होऊन गेला पण त्यानेही कधी असा निर्णय घेतला नाही. देशाचे रक्षण कोणी करायचे, हे ज्याला कळत नाही, ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. (UPI आणि क्रेडिट कार्ड लिंक करुन वाढवू शकता तुमचा क्रेडिट स्कोर; कसं?) मोदी सरकारच्या निर्णयामुळे देशात अराजकता निर्माण झाली आहे. तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला आहे. महाराष्ट्रातही खदखदत आहेत. पण राज्याची सूत्र हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. त्यामुळे महाराष्ट्र शांत आहेत आणि राहणार आहे, काही जण अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्हाला ते जमणार नाही, असंही संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावलं.

  Published by:sachin Salve

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Leave a Reply

  Your email address will not be published.