Home » ताज्या बातम्या » पंतप्रधान नरेंद्र मोदी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या एकाच मंचावर उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या एकाच मंचावर उपस्थिती

पंतप्रधान-नरेंद्र-मोदी-मुख्यमंत्री-उद्धव-ठाकरे-यांची-उद्या-एकाच-मंचावर-उपस्थिती

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यातच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील राजभवन इथे उद्या  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारी गॅलरीचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. राजभवनात उद्या दुपारी चार वाजता क्रांतिकारी गॅलरीचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा पहिला कार्यक्रम पुण्यातील देहूमध्ये आहे. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचे अन् शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडले होते, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे.

या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचे उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला देखील  मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.

Leave a Reply

Your email address will not be published.