Home » ताज्या बातम्या » करेक्ट कार्यक्रम…! अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर : चित्रा वाघ

करेक्ट कार्यक्रम…! अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर : चित्रा वाघ

करेक्ट-कार्यक्रम…!-अकेला-देवेंद्र-क्या-करेगा-म्हणणाऱ्यांना-दणदणीत-उत्तर-:-चित्रा-वाघ

मुंबई : अतिशय नाट्यमयरित्या राज्यसभेच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये भाजप पक्षाचे तीन तर महाविकास आघाडी पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले. या निवडणूक निकालावरून मात्र राज्यात सध्या राजकीय नेत्यांची जोरदार शेरेबाजी सुरु असलेली पाहायला मिळत आहे.या लढतीवरून भाजपच्या चित्रा वाघ यांनी ‘करेक्ट कार्यक्रम….अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणार्यांना दणदणीत उत्तर’ अशा आशयाचे ट्विट केले आहे.

या निवडणूकीत संजय पवार आणि धंनजय महाडिक यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीचा निर्णय महत्वाचा ठरला आणि भाजपच्या महाडिक यांना यात विजय मिळाला. या निवडणुकीतून भाजपच्या झालेल्या विजयाचे श्रेय त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे त्यांच्या ट्विटवरून दिसते आहे. शिकवाय त्यांनी दुसरे एक ट्विट करीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपचा विजय झाला असे आम्हीं मानत नाही असे म्हंटले होते. त्यावरून यशोमती ठाकूर यांनी “भाजपने जागा जिंकली पण मी त्यांचा विजय मानत नाही इति संजय राऊत. देश संविधानानुसार चालतो…तुमच्या मानण्या न मानण्यावर नाही हो सर्वज्ञानी ” असे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

करेक्ट कार्यक्रम….अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणार्यांना दणदणीत उत्तर….💪💪👍👍@Dev_Fadnavis #DevendraFadnavis #bjp pic.twitter.com/TLyDJtZ8Lk

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 11, 2022

काय म्हणाले संजय राऊत ?

हा विजय म्हणजे यंत्रणांचा गैरवापर करुन मिळवलेला विजय आहे. आमची ज्या पद्धतीने मते बाद करण्यात आली ते पाहता यंत्रणेचा गैरवापर झाला असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. काही घोडे बाजरात नेहमीच असतात. हरभरे टाकले की ते कुठेही जातात जिकडे हरभरे तिकडे घोडे असतात. अशाच काही घोड्यांनी दगाबाजी केली आहे. त्यामुळेच आमच्या उमेदवाराचा पराभव झाला. आम्ही त्यांना पाहून घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय पुढे बोलताना ते म्हणाले, आघाडीसोबाबत असलेल्या अपक्षांमुळे मते फुटली असली तरी आघाडीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही विशेषतः महाराष्ट्रात घोडे इकडे असतील किंवा तिकडे असतील ते हरभरे टाकले की कुठेही जातात असा हल्लाबोल त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published.