Home » ताज्या बातम्या » Rajya Sabha Election Result : राऊतांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

Rajya Sabha Election Result : राऊतांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

rajya-sabha-election-result-:-राऊतांसह-काँग्रेस-आणि-राष्ट्रवादीचे-उमेदवार-विजयी

मुंबई, 11 जून : राज्यसभा निवडणुकीवरुन (rajya sabha election result) महाराष्ट्रामध्ये अभुतपूर्व राजकीय नाट्य पाहण्यास मिळालं. अखेरीस 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडी सरकारने (mva governmet) भाजपला धोबीपछाड दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाली आहे. तर भाजपकडून पियुष गोयल विजयी झाल्याचे वृत्त आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं होतं. राज्यसभेच्या सहा जागांसाठी असणाऱ्या या निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार उतरवल्याने चुरस वाढली होती. महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु होते. त्यामुळे निवडणुकीच्या एक दिवसआधी रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीचे बैठकींचे सत्र सुरु होते. भाजपने सातवा उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. पण अखेर ही निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच डंका वाजला आहे. प्राथमिक निकाल हाती आला आहे,  संजय राऊत 42 मतं घेऊन विजय झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढी यांचा विजय झाला आहे. पहिली फेरी, कुणाला किती मतं ? पियूष गोयल – 48 अनिल बोंडे – 48   संजय राऊत 41 प्रफुल्ल पटेल – 43 इम्रान प्रतापगढी 44 संजय पवार – 33 धनंजय महाडिक – 27 तर, शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. राज्यसभेच्या निवडणुकीत सहावी जागा खूप चर्चेत राहिली. कारण सुरुवातीला या जागेच्या उमेदवारीचा तिढा सुटत नव्हता. या जागेवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष आमदार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निश्चय केला होता. त्यासाठी त्यांनी सर्व आमदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार अशी माहिती समोर आली. पण शिवसेनेने पक्षात सहभागी होण्याची अट ठेवल्याने संभाजीराजे यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. संभाजीराजेंनी शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावला. त्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. पण संजय पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने सहाव्या जागेसाठी सातवा उमेदवार उभा केला. भाजपने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपने सातवा उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीची धाकधूक वाढली होती. त्यामुळे महाविकास आघाडीने भाजपसमोर बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव ठेवला. पण भाजपने तो प्रस्ताव धुडकावला. त्यानंतर जसजसी निवडणुकीचा दिवस जवळ येऊ लागला तसतसं महाविकास आघाडीचं बैठकसत्र वाढू लागलं. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तीन ते चार दिवसांआधी महाविकास आघाडीचे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले मुंबईतीली विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या दरम्यान महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वेगळ्या बैठका झाल्या. दुसरीकडे भाजपच्या गोटात मविआच्या तुलनेत तितक्या घडामोडी घडताना दिसल्या नाहीत. निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजपचे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व आमदारांना मतदान कसं करायचं याबाबत सूचना देण्यात आली होती.

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.