Home » ताज्या बातम्या » जोडलेल्या जुळ्या लेकींना पाहून बसला धक्का; पालकांनी त्यांच्यावर 'चाकू' फिरवला

जोडलेल्या जुळ्या लेकींना पाहून बसला धक्का; पालकांनी त्यांच्यावर 'चाकू' फिरवला

जोडलेल्या-जुळ्या-लेकींना-पाहून-बसला-धक्का;-पालकांनी-त्यांच्यावर-'चाकू'-फिरवला

वॉशिंग्टन, 02 जून : आपल्याला किमान एक तरी मूल असावं असं स्वप्नं बहुतेक दाम्पत्याचं असतं. त्यात जर जुळी मुलंच पदरात पडली तर हा आनंद दुप्पट होतो. पण जर ही जुळी मुलं शरीरानेही एकमेकांना जोडलेली असतील तर…(Conjoined twins surgery) अशीच जुळी मुलं एका कपलला झाली. बाळ पोटात असताना ती एकमेकांना जोडलेली असल्याचं समजलं आणि जन्मानंतर त्यांना वेगळं करण्यासाठी त्यांच्या पालकांनी काळजावर दगड ठेवून एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या या जुळ्या लेकींना एकमेकांपासून शरीराने वेगळं करण्यासाठी त्यांच्या चाकू फिरवण्याचं ठरवलं (Conjoined twins sisters surgery). मिशिगनमधील 35 वर्षांची एलिसन इरविनला दुसऱ्यांदा आई होणार होती. रूटिन स्कॅनिंगमध्ये प्रेग्नन्सीच्या 20 व्या आठवड्यात तिच्या पोटातील बाळांबाबत तिला समजलं. तिच्या पोटात जुळ्या मुली होत्या. तिला आनंद झाला. पण हा आनंद काही क्षणापुरताच टिकला. कारण या जुळ्या मुळी एकमेकांना जोडलेल्या होत्या. या मुली जिवंत राहतील का? जन्माला आल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं असेल? अशी चिंता एलिसन आणि तिच्या नवरा फिल सतावू लागली. त्यांनी तज्ज्ञांची भेट घेतली. मुली छातीपासून पोटाच्या बेंबीपर्यंत जोडलेल्या होत्या. त्यांचं यकृत एकच होतं. जर त्यांना सर्जरी करून वेगळं केलं आणि त्यांचं हृदयही एकच असेल तर त्यांना कधीच वेगळं करता येणार नाही. अशा स्थितीतही मुली जन्माला आल्या तर त्या जिवंत राहणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. यामुळे दाम्पत्य अधिकच घाबरलं. हे वाचा – आश्चर्य! महिनाभरातच दोनदा Pregnant झाली महिला; चमत्कारिक Pregnancy बाबत डॉक्टर म्हणाले… प्रेग्नन्सीच्या 25 व्या आठवड्यात त्यांचं लिव्हर एक पण हृदय वेगवेगळे असल्याचं समजलं. ज्यामुळे त्यांना वेगळं करणं शक्य होतं. तेव्हा कुठे दाम्पत्याच्या जीवात जीव आला. जर त्यांना तसंच एकमेकांना जोडलेलं ठेवलं असतं तर त्यांचं आयुष्य कष्टदायी होतं. त्यांना बऱ्याच समस्या उद्भवल्या असत्या आणि सर्जरी करून वेगळं कऱण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या जीवाला धोका होता. सर्जरी करून त्यांना वेगळं करणं आव्हानात्मक होतं. शेवटी दाम्पत्याने डॉक्टरांवर विश्वास ठेवत काळजावर दगड ठेवून आपल्या पोटच्या लेकींना शरीराने एकमेकींपासून वेगळं कऱण्यासाठी त्यांच्या शरीरावर चाकू फिरवण्याचा निर्णय घेतला. त्यांची जबाबदारी घेत त्यांनी डॉक्टरांना सर्जरी करण्याची परवानगी दिली.

11 जून 2019 रोजी दोघींचा जन्म झाला. जन्माच्या तीन महिन्यांनंतर त्यांना घरी आणण्यात आलं. 6 महिन्यांनी त्यांची सर्जरी होणार होती. कोरोनामुळे फेब्रुवारी 2020 मध्ये होणारी सर्जरी पुढे ढकलण्यात आली. ज्यामुळे पालकांची धाकधूक वाढली. अखेर ऑगस्ट 2020 मध्ये ऑपरेशन झालं. काही तासांतच ऑपरेशन यशस्वी झाल्याची बातमी दाम्पत्याला मिळली. दोघीही ठिक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि भावुक झालेल्या कपलला रडू कोसळलं. हे वाचा – VIDEO – World Record साठी 103 वर्षांच्या आजीने आकाशातून मारली उडी आणि असा शेवट झाला की… त्यांच्या ऑपरेशनच्या वर्षभरानंतर त्यांचं आयुष्य कसं आहे, हे दाखवणारा व्हिडीओ  मिशिगन युनिव्हर्सिटीच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “जोडलेल्या जुळ्या लेकींना पाहून बसला धक्का; पालकांनी त्यांच्यावर 'चाकू' फिरवला

Leave a Reply

Your email address will not be published.