Home » ताज्या बातम्या » ‘जुग जुग जिओ’चा ट्रेलर रिलीज

‘जुग जुग जिओ’चा ट्रेलर रिलीज

‘जुग-जुग-जिओ’चा-ट्रेलर-रिलीज
मुंबई – अभिनेत्री कियारा अडवाणीच्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. या चित्रपटानंतर आता पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात कौटुंबिक मनोरंजन दिसून येणार आहे.

यातच धर्मा प्रोडक्शनच्या या चित्रपटात खूप फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार असल्याचे या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता वरुण धवन सध्या त्यांच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक कलाकार सोशल मीडियावर त्याचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

‘जुग जुग जिओ’च्या नवीन पोस्टरमध्ये अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी हे हॅप्पी फॅमिली म्हणून दिसत आहेत. पॉवरपॅक्ड फॅमिली एन्टरटेनर चित्रपटाचा ट्रेलर  प्रदर्शित झाला आहे.

धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेला ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट राज मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. 24 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिनेता मनीष पॉल आणि YouTuber प्राजक्ता कोळी यांच्याशिवाय कियारा अडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर देखील दिसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.