Home » ताज्या बातम्या » चेन्नईविरुद्धचा विजय गुजरातला IPL ट्रॉफी जिंकण्याची आणखी एक संधी देईल

चेन्नईविरुद्धचा विजय गुजरातला IPL ट्रॉफी जिंकण्याची आणखी एक संधी देईल

चेन्नईविरुद्धचा-विजय-गुजरातला-ipl-ट्रॉफी-जिंकण्याची-आणखी-एक-संधी-देईल

मुंबई, 14 मे : आयपीएल 2022 च्या 62 व्या सामन्यात, प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्कं केलेला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ आमनेसामने असतील. एकीकडे सीएसके सन्मान वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, गुजरात टॉप 2 मध्ये आपलं स्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. गुजरात 9 विजय मिळवून 18 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मात्र, आणखी एका विजयामुळे त्यांचं अव्वल 2 मध्ये स्थान निश्चित होईल. कोणताही संघ गुजरातला टॉप 2 मधून बाहेर काढू शकणार नाही. टॉप 2 मध्ये स्थान मिळवणे म्हणजे संघाला अंतिम फेरीत जाण्याची अतिरिक्त संधी मिळते. CSK चा संघ गुणतालिकेत खालून दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच 9व्या स्थानावर आहे. गेल्या सामन्यात गुजरातने या मोसमात पदार्पण करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सचा 62 धावांनी पराभव केला होता. यासह त्यांनी प्लेऑफमध्येही स्थान निश्चित केले होते. तर CSK ला गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. गुजरातचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पुनरागमन गुजरातच्या या गौरवशाली प्रवासात सर्वात मोठा वाटा होता तो सलामीवीर शुभमन गिल, कर्णधार हार्दिक, डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा आणि राहुल तेवतिया, जे शानदार फलंदाजी करत आहेत. कठीण परिस्थितीतही पुनरागमन करणे हा टायटन्सचा सर्वात मोठा गुण आहे. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये पांड्या, मिलर आणि तेवतिया काहीशा लयपासून दूर गेलेले दिसले. गुजरातचे बलस्थान हे त्याचे गोलंदाजी आक्रमण आहे, ज्यात मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन आणि रशीद खानसारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. शमीने आतापर्यंत 16 विकेट घेतल्या असून तो गुजरातचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

अंबाती रायडूने अचानक IPL मधून निवृत्ती होण्याचं ट्विट का केलं? CSK ने उलगडलं रहस्य

अनेक गोष्टी चेन्नईच्या विरोधात आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नईबद्दल सांगायचे तर, स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच अनेक गोष्टी त्याच्या बाजूने गेल्या नाहीत. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी धोनीने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले, ते चुकीचे ठरले. स्पर्धेच्या मध्यावर जडेजाने पुन्हा धोनीवर ही जबाबदारी सोपवली. जडेजा दुखापतीमुळे शेवटच्या सामन्यापूर्वी घरी परतला. याशिवाय संघाचा स्टार गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे याआधीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. संघाला त्याची आणि अॅडम मिल्नेची उणीव भासली. मात्र, डेव्हॉन कॉनवेने मिळालेल्या सर्व संधींचा फायदा घेतला आणि त्याने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. मुकेश चौधरी आणि सिमरनजीत सिंग यांनी प्रभावित केले. परंतु, दर्जेदार नवीन-बॉलरच्या कमतरतेशिवाय, मोईन अली आणि महेश दिक्षाना देखील फिरकी विभागात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.