तळेगाव स्टेशन : पुणे-लोणावळा लोकल उशिरा धावत असल्यामुळे शुक्रवारी चाकरमानी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. सकाळी तळेगावातून सकाळी 9.47 ला पुण्याकडे जाणारी लोकल सकाळी 10.20 ला रवाना झाली. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. लोणावळा येथून तळेगावमार्गे पुणेच्या दिशेने जाणार्‍या सुमारे 18 व परत येणार्‍या 18 लोकल आहेत. तळेगाव येथून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या 3 व परत येणार्‍या सुमारे 3 लोकल आहेत. अनेक वेळा या लोकल उशिरा धावतात. कधी कधी काही लोकल अचानक रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

अनेक वेळा लोकल रद्द होत असल्यामुळे चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तसेच, अनेक वेळा विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे. शाळा, कालेजला वेळेवर जात येत नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
अनेक लोकल अनियमित धावत असल्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी, छोटे-मोठे व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
                                             – अनिल वेदपाठक,  सामाजिक कार्यकते