तलाठी

News

  • मुख्यपृष्ठ
  • बातम्या &nbsp/ औरंगाबाद
  • ACB Action: तलाठी ‘अप्पा’ची हिम्मत तर बघा! थेट ‘फोन पे’वरून घेतली 10 हजारांची लाच

ACB Action: तलाठी ‘अप्पा’ची हिम्मत तर बघा! थेट ‘फोन पे’वरून घेतली 10 हजारांची लाच

ACB Action: खडी व मुरूम वाहतुकीचा हायवा सुरळीत चालू देण्यासाठी 70 हजारांची लाच दोन तलाठ्यांनी मागितली होती.

By: मोसीन शेख | Updated at : 31 Dec 2022 11:02 AM (IST)

maharashtra News Aurangabad Crime News Talathi from Aurangabad took a bribe of ten thousand from Phone Pay ACB Action: तलाठी 'अप्पा'ची हिम्मत तर बघा! थेट 'फोन पे'वरून घेतली 10 हजारांची लाच

Aurangabad Crime News

Aurangabad Crime News: औरंगाबाद” href=”https://marathi.abplive.com/news/aurangabad” target=”_self”>औरंगाबाद लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad Anti Corruption Bureau) आणखी मोठीं कारवाई करत, लाच (Bribe) मागणाऱ्या दोन तलाठ्यांसह (Talathi) अन्य एकाला सापळा लावून पकडले आहे. खडी व मुरूम वाहतुकीचा हायवा सुरळीत चालू देण्यासाठी 70 हजारांची लाच या दोन्ही तलाठ्यांनी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, दोघांविरुद्ध बिडकीन पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर महालकर (तलाठी, रांजणगाव खुरी, ता. पैठण), देविदास बनाईत (तलाठी, मुलानी वडगाव व लोहगाव, ता. पैठण) व शिवाजी इथापे अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील पहिला आरोपी महालकर याने 10 हजार रुपये ‘फोन पे’वरून (Phonepe) स्वीकारले होते. 

बिडकीन आणि चित्तेगाव परिसरात अनेक खडी क्रेशर असल्याने या भागात खडीची वाहतूक करणारी अनेक वाहने चालतात. दरम्यान तक्रारदाराचा खडी व मुरूम वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यामुळे खडी व मुरुमाचा हायवा सुरळीत चालू देण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर महालकर याने तक्रारदाराकडे 29 डिसेंबररोजी स्वतः साठी 40  हजार रुपयांची लाच मागितली. तसेच दुसऱ्या दिवशी 30 डिसेंबररोजी देविदास बनाईत यांच्यासाठी 40  हजार अशी एकूण 70  हजार रुपयांची मागणी शिवाजी इथापे यांनी केली होती. 

लाच घेतांना रंगेहात पकडले! 

मात्र तक्रारदारांस लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. लाचेची मागणी केल्यानुसार शुक्रवारी आरोपी ज्ञानेश्वर महालकर यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपये फोन-पेवरुन स्वीकारले. तर शिवाजी इथापे याने देविदास बनाईत यांच्यासाठी 40 हजार रुपये तक्रारदारांकडून स्वीकारले. हे पैसे घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले. त्यानंतर या प्रकरणी बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

live reels News Reels

लाच घेणाऱ्यांची हिम्मत वाढली! 

यापूर्वी अनेकदा लाच तिसऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीने घेतल्याचे समोर यायचे. मात्र आता लाच घेणाऱ्यांची हिम्मत अधिकच वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण थेट फोन पे किंवा ऑनलाइन लाच स्वीकारली जात असल्याच्या घटना समोर येत आहे. गेल्या आठवड्यात बिडकीन पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर देखील एसीबीकडून कारवाई करण्यात आली होती. यात देखील आरोपीने फोन पे वरून लाच घेतली होती. त्यात आता तलाठी यांच्यावर झालेल्या कारवाईत देखील 10 हजार रुपये फोन पे वरून स्वीकारण्यात आले आहेत. त्यामुळे लाच घेणाऱ्यांची हिम्मत वाढली असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. 

हद्दच झाली राव! पोलीस कर्मचाऱ्याने जेवणासाठी चक्क ‘फोन पे’वरून घेतली पंधराशे रुपयांची लाच” href=”https://marathi.abplive.com/news/aurangabad/maharashtra-news-aurangabad-crime-news-the-policeman-asked-for-a-bribe-of-1500-rupees-through-phone-pay-for-food-1134466″ target=”_self”>हद्दच झाली राव! पोलीस कर्मचाऱ्याने जेवणासाठी चक्क ‘फोन पे’वरून घेतली पंधराशे रुपयांची लाच

Published at : 31 Dec 2022 11:02 AM (IST) Tags: bribe PhonePe Aurangabad Crime News Aurangabad Crime Aurangabad news

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *