'…तर मी सरकार चालवतो', उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना थेट चॅलेंज!

'…तर-मी-सरकार-चालवतो',-उद्धव-ठाकरेंचं-मुख्यमंत्र्यांना-थेट-चॅलेंज!

मुंबई, 5 डिसेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागाचा प्रश्न आणि भाजप नेत्यांची छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची वादग्रस्त वक्तव्य या मुद्द्यावरून महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. 17 डिसेंबरला महाविकासआघाडी मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मोर्चा काढणार आहे. या मोर्चाआधी महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं आहे.

‘आम्ही बेळगावला कधीही जाऊ शकतो. ज्याची जबाबदारी आहे ते स्वीकारणार आहेत का नाही? का गुवाहाटीला जाऊन बोलणार? सरकारने जाहीर करावं आम्हाला जमणार नाही, मग बेळगाव आणि सरकार चालवण्यापासून मी सर्व करतो,’ असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं.

राज्यपालांवर घणाघात

‘सरकार कायदेशीर का बेकायदेशीर हे अजून ठरायचं आहे, पण राज्यपालांकडून महाराष्ट्रात आपल्या महापुरुषांचा सातत्याने अपमान होत आहे. कर्नाटक सरकार आक्रमक भूमिका घेत आहे. महाराष्ट्रातील गावं दुसऱ्या राज्यात जायचं म्हणत आहेत. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. लवकरच कर्नाटकात निवडणूक होत आहे, म्हणून आपली गावं त्यांना देणार का?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

फक्त राज्यपालच नाही तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात हा मोर्चा असेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *