तरूणाईचे प्रश्न अन् त्यावरचा उपाय, ऐका सत्यजीत तांबे काय म्हणाले?

तरूणाईचे प्रश्न अन् त्यावरचा उपाय, ऐका सत्यजीत तांबे काय म्हणाले?
आयेशा सय्यद, Tv9 मराठी
Updated on: Jan 25, 2023 | 8:12 AM
सत्यजीत तांबे यांनी एका कार्यक्रमात तरुणाईशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तरूणाईच्या समस्या आणि त्यावरचा उपायही त्यांनी सांगितला. पाहा ते काय म्हणालेत…
सत्यजीत तांबे यांनी एका कार्यक्रमात तरुणाईशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तरूणाईच्या समस्या आणि त्यावरचा उपायही त्यांनी सांगितला. “आजकाल तरूण चांगलं शिक्षण घेतात. डॉक्टर इंजिनिअर होतात. पण या शिक्षणानंतर नोकरीसाठी जर या तरूणांना दुसऱ्या शहरात जावं लागत असेल तर ते योग्य नाही. आधीच मिळणारा तुटपुंजा पगार अन् त्यामुळे या मुलांचे हाल होतात. घरापासून दूर राहावं लागतं. दुसऱ्या शहरात राहण्यासाठी अव्वाच्या सव्वा खर्च येतो. या सगळ्यात जर बदल करायचा असेल तर आपल्याला चांगल्या लोकप्रतिनिधींची गरज आहे”, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलंय.