तब्बूच्या शिव्या, अर्जुनची अ‍ॅक्शन; 'कुत्ते' नववर्षाच्या सुरुवातीला घालणार राडा

तब्बूच्या-शिव्या,-अर्जुनची-अ‍ॅक्शन;-'कुत्ते'-नववर्षाच्या-सुरुवातीला-घालणार-राडा

मुंबई, 20 डिसेंबर :    अर्जुन कपूर, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह अभिनित आगामी ‘कुत्ते’  या सिनेमाची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. दर्शकांमध्ये उत्कंठा वाढत असतानाच अलीकडेच, निर्मात्यांनी या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित केले. अशातच, सिनेमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणता सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित केलाय.  मनोरंजक आणि इंटेन्स ट्रेलरला प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. डार्क ह्युमरने भरपूर असलेल्या या ट्रेलरमध्ये सात ग्रे-शेडेड पात्र पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. नव्या वर्षात कुत्ते सिनेमा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. 13 जानेवारीला सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कुत्ते या सिनेमात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाजसह कुमार, लव रंजन, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज अशी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री तब्बू आणि अर्जुन कपूर सिनेमात पोलिसांच्या भूमिकेत आहेत. त्यातही तब्बूची पोलीस इन्स्पेक्टर सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. तब्बूच्या आतापर्यंतच्या सिनेमातील तिचा हा सिनेमा वेगळा ठरू शकतो. तब्बूचे बेधडक डायलॉग्स पाहून चाहत्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत. पोलिसांच्या खाकीतील रूबाबदार तब्बू सर्वांपेक्षा वेगळी वाटत आहे.

हेही वाचा – वादग्रस्त वक्तव्य भोवली! अभिनेत्याला हजारोंचा गर्दीत चप्पलेचा प्रसाद, Video व्हायरल

” isDesktop=”true” id=”802605″ >

तब्बूच्या शिव्या आणि अर्जुन कपूरची अँक्शन ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, राधिका मदन यांच्याही तगड्या भूमिका पाहायला मिळत आहेत. नववर्षाच्या स्वागताला कुत्ते हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालेल असं दिसत आहे.

आज एका स्टार-स्टडेड कार्यक्रमात ‘कुत्ते’या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ट्रेलर लाँचला सिनेमाची सगळी स्टार कास्ट  तसेच दिग्दर्शक आसमान भारद्वाज, त्यांचे वडील विशाल भारद्वाज हे उपस्थित होते. लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मिती करण्यात आली आहे. सिनेमाला  विशाल भारद्वाज  संगीत देणार असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *